Video : काय बोलावं या बाईला! स्वतःच्याच हाडापासून बनवले कानातले; पुढे नेकलेसही बनवणार, बाईचे हे डोकं पाहून नेटकरी हैराण
या बाईला आता काय बोलावं असंच तुम्हाला वाटेल कारण तिने केलंच तसं आहे. सर्जरी करून निघालेल्या हाडांपासून तिने अस काही केलंय की, नेटकऱ्यांनी चक्क डोक्यावर हात मारला आहे, त्याचा फोटो तिने शेअर केला आहे. तुम्हीच वाचा तिने केलेला प्रताप

दागिने म्हटलं की सोनं, चांदी हिरे किंवा मोती डोळ्यांसमोर येतात. पण एका महिलेने चक्क स्वत:च्या चेहऱ्याच्या हाडांपासून कानातले बनवून घेतले आहेत. वाचायला थोडं विचित्र वाटेल पण या महिलेने आपल्या आयुष्याची एक महत्त्वाच्या बदलाची आठवण म्हणून असा प्रकार केला, हा अनोखा मार्ग निवडला. तिच्या या दागिन्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांना काय बोलावं आणि काय करावं हे सूचनासे झाले आहे.
डॉक्टराकडून मागून घेतले हाडांचे तुकडे
टेक्सासमध्ये राहणाऱ्या ऑब्रे या 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ट्रान्सजेंडर महिला आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील बदलांच्या प्रवासाचा एक भाग म्हणून चेहऱ्याची फेमिनायझेशन सर्जरी म्हणजेच स्त्री दिसण्यासाठी सर्जरी केली. या प्रक्रियेदरम्यान चेहऱ्याच्या हाडांवर आणि मऊ ऊतींवर काही बदल केले. या सर्जरी दरम्यान चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांतून हाडांचे काही छोटे तुकडे काढण्यात आले. मात्र ते टाकून देण्याऐवजी ऑब्रे यांनी ते स्वत:कडे ठेवण्याची इच्छा डॉक्टरांकडे व्यक्त केली. वैद्यकीय पथकानेही त्यांना परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी हे तुकडे जपून ठेवले.
.ा
हाडांचे तुकडे बनले खास दागिने
काही काळानंतर ऑब्रे यांच्या मनात या हाडांच्या तुकड्यांपासून दागिने बनवण्याची कल्पना आली. त्यासाठी त्यांनी रेडिटच्या माध्यमातून एका दागिने डिझायनशी संपर्क साधला. या डिझायरने त्यांच्या कल्पनेला आकार दिला आणि हाडांच्या तुकड्यांपासून खास कानातले तयार केले.
पुढे नेकलेस बनवण्याचाही विचार
ऑब्रे यांनी सोशल मीडीयावर या कानातल्यांचे फोटो शेअर करत आपल्याकडे अजून काही हाडांचे तुकडे शिल्लक असल्याचं सांगितलं. त्यांच्यापासून पुढे नेकलेस बनवण्याचाही विचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑब्रे यांच्यासाठी हे दागिने केवळ फॅशनची वस्तू नाहीत. स्वत:ची ओळख स्वीकारण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा हा त्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे. त्यामुळेच त्यांच्या या अनोख्या कल्पनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
