PM Narendra Modi: आशियाचा ‘बॉस’ कोण? दमदार नेत्यांच्या यादीत मोदी कुठे?
Asia Most Effective Leaders 2026: भारताशिवाय आशियाची कल्पना करता येणं अशक्य आहे. चीनसह भारत हा आशियातील सर्वात प्रमुख देश आहे. जगातील एक मोठी बाजारपेठ आहे. मग आशियातील सर्वात दमदार नेता कोण आहे? कोण आहे आशियाचा बॉस?

Asia Power Index 2026: आशियाच्या राजकारणात आणि मुत्सदेगिरीत कोणाच्या शब्दाला वजन आहे. कोणाचा सर्वाधिक दबदबा आहे. याविषयीचा एक दावा समोर आला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने (Lowy Institute) वर्ष 2026 मधील आशिया पॉवर इंडेक्सचा (Asia Power Index 2026) अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबरदस्त झेप घेतली आहे. या नवीन रँकिंगनुसार, पीएम मोदी आशियातील दुसरे सर्वात दमदार नेते ठरले आहेत. यापूर्वी ते तीन क्रमांक पिछाडीवर होते. ते पाचव्या स्थानी होते. या यादीत अर्थातच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) हे प्रथम क्रमांकावर आहेत.
कुटनीतीमध्ये भारताचा डंका, पीएम मोदींचे वाढले स्थान
लोवी इन्स्टिट्यूटच्या ताज्या अहवालानुसार, एकूण 27 देश आणि क्षेत्रीय विविध 131 कसोट्यांवर हा अहवाल तयार करण्यात आला. त्यात भारताची कुटनीती सर्वाधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये भारताला 70.3 अंक मिळाले आहेत. या अहवालानुसार, मोदींचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर आशिया, पश्चिम, पूर्वोत्तर, अग्नेय आशियातही दिसून आला. त्यांची कुटनीती प्रभावशाली ठरली. त्यामुळेच त्यांनी पाचव्या क्रमाकांवरून थेट दुसऱ्या क्रमांकावर या यादीत झेप घेतली.
भारत आशियातील तिसरा सर्वाधिक शक्तीशाली देश
मोदी सरकारची कुटनीती, संरक्षण करार आणि सांस्कृतिक प्रभावाच्या जोरावर भारताने आशियात आता अधिक मजबूत स्थान निर्माण केल्याचे दिसून येत आहे. आशियात प्रभाव असणाऱ्या तीन देशात पहिल्या क्रमांक अमेरिका अबाधित आहे. अमेरिका आशियाचा भाग नसला तरी सैन्य ठिकाणं आणि अनेक देशातील प्रभावामुळे अमेरिकेचा दबदबा कायम आहे. तर दुसर्या क्रमांकावर चीन आहे. या यादीत भारत हा आशियातील तिसरा सर्वाधिक शक्तीशाली देश ठरला आहे. यापूर्वी जपान, दक्षिण कोरिया, तैवान या अर्थव्यवस्थांनी त्यांची यादीत चुणूक दाखवली आहे.
आर्थिक आव्हानं असतानाही भारताचा दबदबा
2026 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोर ऊर्जा संकटांमुळे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले. त्यातच भारत आणि अमेरिकेतील वाढलेला तणाव, आर्थिक कराराला अंतिम स्वरूप न मिळणे या कारणांमुळे मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले. पण भारताने माघार घेतली नाही. भारतात परदेशी गुंतवणुकीत मोठी घसरण झाली असली तरी आर्थिक घौडदौड कायम असल्याने जग सुद्धा बुचकाळ्यात पडलेले आहे. भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक मोर्चावर दमदार घौडदौड करत आहे.
