AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Crash In Nov : सोनं 14000 हजाराने दणादण कोसळलं, पुढच्या 15 दिवसात मोठं काही घडणार, एक्सपर्टच्या भाकिताने खळबळ

नोव्हेंबरमध्ये सोन्याचे दर 14,000 रुपयाहून अधिक स्वस्त झाले आहेत, ज्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोनं आणखी स्वस्त होणार की महागणार, हे ठरवण्यासाठी पुढील 15 दिवस महत्त्वाचे आहेत. अमेरिकेतील महागाई, रोजगार अहवाल आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयावर सोन्याच्या भावाचे भवितव्य अवलंबून आहे.

Gold Crash In Nov : सोनं 14000 हजाराने दणादण कोसळलं, पुढच्या 15 दिवसात मोठं काही घडणार, एक्सपर्टच्या भाकिताने खळबळ
Gold Crash Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 3:02 PM
Share

एकट्या नोव्हेंबर महिन्यात सोन्या चांदीचे भाव दणादण कोसळले आहेत. गेल्या काही काळापासून सोन्याच्या भावात 3 टक्क्याने वाढ झाली आहे. त्यानंतरही नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला आतापर्यंत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं 14 हजाराहून अधिक रकमेने स्वस्त झालं आहे. त्यामुळे ग्राहकांची चांदीच झाली आहे. या काळात ग्राहकांनी प्रचंड सोनं खरेदी केली आहे. मात्र, सोनं सातत्याने स्वस्त होत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरणही आहे.

सोमवारी सोन्याच्या भावाने उसळी घेतली. सोन्याचे भाव वाढले. त्यामुळे सोनं खरेदी करावं की सोन्याचे दर आणखी घसरण्याची वाट पाहावी? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. गुंतवणूकदारांसाठी येणारे 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या अवधित तीन फॅक्टर्सवर नजर ठेवावी लागणार आहे. त्याचं थेट कनेक्शन अमेरिकेशी आहेत. त्यावरूनच सोनं स्वस्त होणार की महागणार हे ठरणार आहे. एक्सपर्टने खालील काही भाकितं वर्तवली आहेत. त्यामुळे सोनं स्वस्त होणार की महागणार याचा अंदाज येणार आहे.

नोव्हेंबरमध्ये स्वस्ताई

यंदाच्या वर्षात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाली होती. त्यामुळे सर्वच थक्क झाले होते. तर या वर्षाचे शेवटचे महिनेही चर्चेत आले आहेत. कारण या महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. चालू नोव्हेंबर महिन्यात 1,40,186 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरापासून 4 डिसेंबरचं एक्सपायरीवालं सोनं एमसीएक्सवरून घसरून 1,26,021 रुपयांवर आलं आहे. सोमवारी याच्या भावात 4243 रुपयांची घसघशाीत वाढ झाल्यानंतर ही घसरण झाली आहे.

तर सोन्याच्या उच्चांकाशी तुलना केली तर सोन्यात प्रचंड घसरण झाल्याचं दिसून येतं. जानेवारीच्या शेवटच्या महिन्यात सोन्याचा वायदा रेट 1.93 लाख रुपयाच्या पार गेला होता. जानेवारीच्या दराशी तुलना केली तर सोनं 67,000 रुपयाने स्वस्त मिळत आहे.

15 दिवस महत्त्वाचे का?

Gold Rate मध्ये विक्रमी तेजी आल्यानंतर काही कााळासाठी मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळात पडले आहेत. सध्या सोनं ज्या लेव्हलला आहे, त्या पैशात खरेदी करावं की थोडी वाट पाहावी? असा विचार गुंतवणूकदार करत आहेत. तुम्हीही या लिस्टमध्ये असाल तर तुम्हाला 25 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरपर्यंत घडणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवावं लागणार आहे.

25 नोव्हेंबर 2026

सोन्याचा पहिला मोठा ट्रिगर 25 नोव्हेंबर रोजी येणारी यूएस पर्सनल कंजम्प्शन एक्पेंडिचेर (PCE) इन्फ्लेशन रिपोर्ट आहे. FED इंटरेस्ट रेट ठरवताना या इन्फ्लेशन गेजवर जवळून लक्ष ठेवत असतो. अपेक्षेपेक्षा अधिक महागाईमुळे कठोर मॉनेटरी पॉलिसीची आशा अधिक वाढू शकते. त्यामुळे डॉलरला सपोर्ट मिळेल आणि सोन्यावर दबाव येईल.

4 डिसेंबर 2026

दुसऱ्या ट्रिगरचा विचार करायचा झाला तर ही अमेरिकेच्या एम्प्लॉयमेंट रिपोर्ट असेल. ही रिपोर्ट 4 डिसेंबर रोजी येणार आहे. त्यामुळे जॉब क्रिएशनपेक्षा इंटरेस्ट रेट्स मजबूत होऊ शकतो. तर कमकुवत एम्प्लॉयमेंट डेटामुळे कमी अग्रेसिव्ह फेडची आशा वाढणार आहे. त्याने सोन्याच्या भावावर परिणाम होणार आहे.

9 डिसेंबर 2026

Gold Rate रेटवर या 15 दिवसात तिसऱ्या फॅक्टरचा मोठा परिणाम होणार आहे. 9 डिसेंबर रोजी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह डिसेंबरच्या पॉलिसी रेटवर निर्णय घेणार आहे. जर व्याजदरात वाढ झाली तर सोन्याचं आकर्षण कमी होईल. कारण सोन्यामुळे व्याजातून होणारं इन्कम देत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर होणार आहे.

(टीप : सोना-चांदीत गुंतवणूक करताना मार्केट एक्सपर्ट्सचा सल्ला आवश्यक घ्या.)

Follow Us
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपद
पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजप-अकाली दलाची युती, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?
रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
Pratap Sarnaik on Rohit Pawar : रोहित पवार त्यांच्याच पक्षातच एकटे पडले; प्रताप सरनाईकांचा खोचक टोला
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने...
ठाकरे गटाचे नेते शिंदेंच्या बैठकीत, उदय सामंतांच्या सूचक विधानाने चर्चांना उधाण!
आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये...
Onion Price Crash : आठवडाभरात कांद्याचे दर क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; लासलगावमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके...
मुंबईत पुस्तकांचा महासोहळा! 650 स्टॉल्सवर लाखो पुस्तके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात....
Manoj Jarange Case : मनोज जरांगेंविरोधात तक्रार देण्यासाठी अजय बारस्कर पोलीस ठाण्यात; पेन ड्राइव्हमधील पुराव्याने खळबळ
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
Parinay Fuke : रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार? परिणय फुके यांचा मोठा दावा!
जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही....
Gold Silver Price Today : जळगावमध्ये सोनं तोळ्यामागे एवढ्या रुपयांनी महाग; चांदीतही 2000 रुपयांची वाढ VIDEO बघाच
शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
Chhagan Bhujbal : शरद पवार स्वतःहून NDA मध्ये जातील, असं वाटत नाही-भुजबळ
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!