जबरदस्त ऑफर! बसल्या बसल्या 82 हजार रुपये कमावण्याची संधी, फक्त पाहावा लागेल ‘हा’ चित्रपट

वेबसाइटची आणखी एक अट अशी आहे की तुम्हाला सर्व नऊ भाग रेंट किंवा स्ट्रीमवर पाहण्यासाठी तयार राहावं लागेल. तर दहावा भाग 'Fast X'साठी थिएटरमध्ये जावं लागेल. हा चित्रपट येत्या 19 मे रोजी प्रदर्शत होणार आहे.

जबरदस्त ऑफर! बसल्या बसल्या 82 हजार रुपये कमावण्याची संधी, फक्त पाहावा लागेल 'हा' चित्रपट
fast and furiousImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 1:45 PM

मुंबई : तुम्हाला फक्त चित्रपट बघण्यासाठी हजारो रुपये दिले जातील, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण हे खरंय. या भन्नाट ऑफरमुळे एक वेबसाइट चर्चेत आली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला ‘फास्ट अँड फ्युरियस’ या चित्रपटाचे सगळे पार्ट्स बघावे लागतील. त्याबदल्यात तुम्हाला एक हजार डॉलर म्हणजेच जवळपास 82 हजार रुपये मिळतील. ‘फायनान्स बज’ नावाच्या या वेबसाइटने ही कमालीची ऑफर दिली आहे. या ऑफरला Fast and Furious claims adjuster नाव देण्यात आलं आहे. यासाठी तुम्हाला अॅक्शनने परिपूर्ण अशा ‘फास्ट अँड फ्युरियस’ या चित्रपटाच्या सीरिजचे सर्व भाग पहावे लागतील.

चित्रपट पाहण्याच्या अटी-शर्ती

आता चित्रपटाचे सर्व भाग एकाच वेळी पाहायचे का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र सर्व 10 भाग एकाच वेळी पाहायचे नाहीत. त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण ङोतो की चित्रपट कसा आणि किती वेळ पहायचा असेल. यासाठी वेबसाइट तुम्हाला दोन आठवड्यांचा वेळ देणार आहे. पण ही वेबसाइट तुम्हाला सहज एक हजार डॉलर देणार नाहीये. या ऑफर अंतर्गत तुम्हाला प्रत्येक क्रॅश आणि डॅमेजची माहिती मिळवावी लागेल. म्हणजेच चित्रपट पाहताना तुम्हाला सजग राहावं लागेल. सीएनएनच्या रिपोर्ट्सनुसार, तुम्हाला याचीसुद्धा नोंद करावी लागेल की पहिल्या पार्टपासून शेवटच्या पार्टपर्यंत अपघातांची संख्या कमी झाली की जास्त झाली.

जिंकू शकता आकर्षक बक्षीस

वेबसाइटची आणखी एक अट अशी आहे की तुम्हाला सर्व नऊ भाग रेंट किंवा स्ट्रीमवर पाहण्यासाठी तयार राहावं लागेल. तर दहावा भाग ‘Fast X’साठी थिएटरमध्ये जावं लागेल. हा चित्रपट येत्या 19 मे रोजी प्रदर्शत होणार आहे. यासाठी वेबसाइट तुम्हाला 100 डॉलर अधिक देईल. मात्र ही ऑफर फक्त अमेरिकेत राहणाऱ्यांसाठी आहे. या चित्रपटात विन डिझेल, जेसन स्टसेहेमपासून ड्वेन जॉनसनने भूमिका साकारल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.