बॉलीवुडमध्ये कोणत्या स्टारकडे आहे सर्वात सुरक्षित कार? टायगर श्रॉफ गोळीबार घटनेनंतर चर्चा सुरु
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्यानंतर बॉलीवूड स्टारच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बॉलीवूडच्या कोणत्या स्टारकडे आहे अशी बुलेट प्रुफ कार, ज्याच्यावर कोणत्याही गोळीबाराचा आणि बॉम्बस्फोटाचाही परिणाम होत नाही, हे पाहूयात...

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर फायरिंग झाल्याच्या घटनेनंतर पुन्हा एकदा बॉलीवूडच्या ताऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुहूत टायगरच्या कारवर जवळून गोळीबार करण्यात आाल. याआधी अभिनेत्याच्या हालचालींवर पाळत ठेवले गेली होती अशी देखील माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता बॉलीवूडच्या काही आघाडीच्या कलाकारांच्या कारना बुलेट प्रुफ संरक्षण आहे का ? असा सवाल चर्चेत आला आहे.
खास बाब म्हणजे टायगर श्रॉफ ज्या BMW 3 Series Gran Limousine कारमधून प्रवास करत होता. ती काही बुलेटप्रुफ कार नाही. यात एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि आधुनिक ड्रायव्हिंग -सुरक्षा तंत्रज्ञान आहे.परंतू या वाहनाला फॅक्ट्रीतून बुलेटप्रुफ वाहन म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे.अशात कोणत्या बॉलीवूड स्टारकडे सर्वात सुरक्षित कार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.
शाहरुख खानकडे सर्वात सुरक्षित कार
सुपरस्टार शाहरुख खान याच्याकडे Mercedes-Benz S600 Guard कार असल्याची चर्चा अनेक वर्षे सुरु आहे. ही सामान्य लक्झरी सेडान कार नाही. तर हीला सुरक्षे ध्यानात घेऊन खास तयार करण्यात आली आहे.या कारला बुलेट प्रुफ कार आणि बॉम्ब विरोधी कार म्हणून तयार करण्यात आले आहे. या कारची सर्वात खासियत याची आर्मर्ड पॅसेंजर कम्पार्टमेंट आहे. अशा वाहनात सामान्य कारच्या तुलनेत खूप मजबूत सुरक्षा आणि जाड, मल्टी लेअर सुरक्षा ग्लासचा वापर करण्यात आलेला आहे. या कारवर सैन्य स्तराची रायफल किंवा स्नायपर गनच्या गोळ्यांचाही परिणाम होत नाही. या कारचा उद्देश्य केवल रस्ते अपघातातून वाचवणे हा नाही तर बाहेरील हल्ल्याच्या वेळी कारच्या आत बसलेल्या व्यक्तीला सुरक्षित ठेवणे हा असतो.
अनेक स्टारकडे आहे सुरक्षित कार
बॉलीवूडमध्ये शाहरुख खान हाच एकटा बुलेट प्रुफ वाहन असलेला अभिनेता नाही. आमीर खान याच्याकडेही Mercedes-Benz S600 Guard असल्याचे म्हटले जाते. सलमान खान याला आलेल्या धमक्यांमुळे त्याच्या वाहनातही आर्मरिंग आणि बुलेटप्रुफ सुरक्षेने सज्ज कार आहे. शाहरुख आणि आमिर खान याच्या कारची अंडरबॉडी आर्मर इतके मजबूत असते की या कारच्या खाली दोन हँड ग्रेनेड एक साथ फुटले तरी आत बसलेल्या व्यक्तीला खरचटतही नाही असे म्हटले जाते. या कारमध्ये ऑक्सीजन पुरवठा आणि आपात्कालीन एअर फिल्टर असतात. त्यामुळे बाहेर जरी विषारी गॅस हल्ला झाला तरी आतील व्यक्ती सुरक्षित राहातो.
