AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?

ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीने तिच्या फॉलोअर्सनाच फटकारलं आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे, तिने फॉलोअर्सना का फटकारलंय, याबद्दल जाणून घ्या..

इथे मी निर्वस्त्र व्हायला आले नाही..; सबस्क्राइबर्सना फटकारणारी अभिनेत्री होतेय ट्रेंड, कोण आहे ती?
अभिरामी वेंकटचलमImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 09, 2026 | 4:08 PM
Share

सोशल मीडियावर अभिनेत्री अभिरामी वेंकटाचलम ट्रेंडमध्ये आहे. या 35 वर्षीय तमिळ अभिनेत्रीने सोशल मीडिया युजर्सना चांगलंच फटकारलं आहे. अभिरामीसुद्धा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे, जिने इन्स्टाग्रामवर सबस्क्रिप्शन मॉडेल स्वीकारलं आहे. परंतु काही सबस्क्राइबर्सनी तिच्याकडे अश्लील आणि आक्षेपार्ह मागणी केल्यानंतर तिचा संताप अनावर झाला आहे. अशा नेटकऱ्यांना तिने सुनावलं असून याच कारणामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. “मी इथे काही क्रिएटिव्ह फोटो शेअर करण्यासाठी सबस्क्रिप्शन सुरू केलं होतं. याआधी मी हे कधीच वापरलं नव्हतं. परंतु जर तुम्ही माझ्याकडून न्यूडिटीची अपेक्षा करत असाल तर, असं काहीच होणार नाही”, असं तिने स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर नेटकरी खुशाल तिला अनसबस्क्राइब करू शकतात, असंही तिने म्हटलंय.

जर तुम्ही इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी सक्रिय असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की अनेक इन्फ्लुएन्सर्स, सेलिब्रिटी यांनी सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू केलं आहे. याअंतर्गत त्यांच्या फॉलोअर्सना शुल्क भरून त्यांनी शेअर केलेला विशेष कंटेंट पाहता येईल. अभिरामीनेही दरमहा 399 रुपयांचं सबस्क्रिप्शन सुरू केलं आहे. तिचे 700 हून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री अभिरामी ही ‘बिग बॉस तमिळ’चाही एक भाग होती. सबस्क्राइबर्सना उद्देशून तिने लिहिलं, ‘माझ्यावर खूप प्रेम कऱणाऱ्या माझ्या सर्व सबस्क्राइबर्सचे मनापासून आभार. मी माझे काही सर्जनशील फोटो शेअर करण्यासाठी हे पेज सुरू केलं आहे. मी यापूर्वी असं कधीही केलं नव्हतं. पण जर कोणाला अशी अपेक्षा असेल की त्यांनी सबस्क्राइब केलं आहे म्हणून मी त्यांच्यासाठी इथे निर्वस्त्र होऊन उभी राहीन, तर तुम्ही आताच माझ्या पेजला अनसबस्क्राइब करू शकता.’

सबस्क्राइबर्सच्या मागण्यांमुळे संतप्त झालेल्या अभिरामीने पुढे म्हटलंय, ‘मी इथे काय पोस्ट करावं हे मला कोणीही सांगू नये. जे लोक याकडे कलात्मक दृष्टीकोनातून पाहतात, त्यांचंच इथे स्वागत आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ही काही पॉर्न साइट नाही.’ अभिरामीचा हा स्पष्टवक्तेपणा अनेकांना आवडला आहे. म्हणूनच सोशल मीडियावर सध्या ती ट्रेंड होत आहे.

अभिरामी वेंकटचलम ही तमिळ चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे. तिने मॉडेलिंगपासून कारकिर्दीची सुरुवात केली. अभिरामीने 2017 मध्ये ‘मिस तमिळनाडू’चा किताब जिंकला. त्यानंतर तिने 2018 मध्ये विजय देवरकोंडाच्या ‘नोटा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. तिने ‘नेरकोंडा पारवाई’, ‘रॉकेट्री’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. अभिरामीने वेब सीरिजमध्येही काम केलंय.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ