AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलगा वारसदार होऊ शकत…’, अमिताभ बच्चन कोणाला म्हणाले हाच माझा खरा वारसदार?

Aishwarya Rai Bachchan : 'मुलगा आहेस म्हणून वारसदार होऊ शकत नाही...', कोण आहे अमिताभ बच्चन यांच्या अफाट संपत्तीचा वारसदार? ट्विटमुळे कळंल सत्य... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

'मुलगा वारसदार होऊ शकत...', अमिताभ बच्चन कोणाला म्हणाले हाच माझा खरा वारसदार?
| Updated on: Dec 19, 2023 | 12:53 PM
Share

मुंबई | 19 डिसेंबर 2023 : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सासूबाई जया बच्चन यांच्यासोबत मतभेद असल्यामुळे आणि अभिषेक बच्चन मुलगा, पतीच्या असलेल्या जबाबदाऱ्या निभावण्यात अपयशी ठरल्यामुळे ऐश्वर्या हिने सासर सोडलं असल्याच्या देखील तुफान चर्चा रंगल्या आहे. अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना, महानायक अमिताभ बच्चन यांनी जुहू येथील प्रतीक्षा बंगला लेक श्वेता बच्चन हिच्या नावावर केला आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी केलेला एक ट्विट सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. ट्विटमध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या वारसदाराची घोषणा केली आहे.

सांगायचं झालं तर, 2022 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं होतं. तेव्हा बिग बी यांच्या त्यांच्या वारसदाराची घोषणा केली. अमिताभ बच्चन ट्विटमध्ये म्हणाले होते, मुलगा असल्यामुळे वारसदार होत नाही, वारसदार होण्याची तेवढी पात्रता लागते. अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंश राय बच्चन यांच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. ‘मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे : जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे’

पुढे अमिताभ बच्चन म्हणाले, ‘माझा वारसदार अभिषेक तूच आहेस… माझा गौरव… माझा आनंद…’, अमिताभ बच्चन यांची ही सोशल मीडिया पोस्ट जुनी असली तरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील बिग बी यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. बिग बी यांची एक झलक पाहण्यासाठी देखील चाहते प्रचंड उत्सुक असतात.

गेल्या अनेक वर्षांपासून अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पण आज देखील चाहत्यांच्या मनात बिब बींसाठी असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. आजही चाहते अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. बिग बी दोखील कधीही चाहत्यांना नाराज करत नाहीत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त बच्चन कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा