Yami Gautam : बहीण असावी तर अशी… यामीच्या नॅशनल अवॉर्डचं भन्नाट सेलिब्रेशन, बहिणीचं प्रेम पाहून तुम्हीही म्हणाल ‘किती गोड!’

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकताच यामी गौतमने कुटुंबासह सेलिब्रेशन केलं. तिच्या पालकांनी मिठी मारली. तर बहीण सुरीलीने खास पद्धतीने यामीचं कौतुक केलं.

Yami Gautam : बहीण असावी तर अशी... यामीच्या नॅशनल अवॉर्डचं भन्नाट सेलिब्रेशन, बहिणीचं प्रेम पाहून तुम्हीही म्हणाल ‘किती गोड!’
| Updated on: Sep 26, 2026 | 7:49 PM

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि सौंदर्यवती अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘आर्टिकल 370’ या चित्रपटातील तिच्या कामासाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिचा हा पहिलाच नॅशनल अवॉर्ड आहे. यामीला हा पुरस्कार जाहीर होताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते तिला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या यशाचा आनंद यामीने तिच्या कुटुंबासह सेलिब्रेट केला. यामीच्या यशामुळे तिचं कुटुंबही प्रचंड खुश झालं आणि तिची बहीण तर इतकी आनंदी होती की तिने थेट यामीला उचलूनच घेतलं.

बहीणीने यामीचं केलं भरभरून कौतुक

यामी गौतमने नॅशनल अवॉर्ड जिंकून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यामीच्या या मोठ्या यशाचा आनंद तिच्या कुटुंबीयांनीही मनापासून साजरा केला. तिची बहीण सुरीली गौतम हिने आपल्या यूट्यूब व्लॉगमधून या खास सेलिब्रेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली.

यामीच्या या खास यशासाठी घरात तिचा आवडता बेसनाचा हलवाही खास तयार करण्यात आला होता. बहिणीला नॅशनल अवॉर्ड मिळाल्याचा आनंद सुरीलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तिने यामीला मनापासून शुभेच्छा देत तिचं अभिनंदन केलं. त्यानंतर दोघींनी एकमेकींना मिठी मारली. एवढंच नाही तर आनंदाच्या भरात सुरीलीने यामीला चक्क उचलून घेतलं. बहिणीच्या या प्रेमळ अंदाजामुळे यामीही खूपच आनंदी झाली. ती जोरजोरात हसत होती आणि बहिणीसोबत आनंद साजरा केला. या संपूर्ण सेलिब्रेशनमध्ये दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान स्पष्टपणे जाणवत होता.

वडिलांनी दिला बुके, कपाळाचं घेतलं चुंबन

यामीच्या नॅशनल अवॉर्डचं कुटुंबीयांनीही मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यामीच्या वडिलांनी तिच्यासाठी फुलांचा सुंदर गुच्छ आणला होता. मुलीला बुके देताना त्यांनी तिला प्रेमाने मिठी मारली आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. वडिलांच्या या प्रेमळ शुभेच्छांनंतर यामीने त्यांचे आभार मानले. त्यानंतर तिच्या आईनेही तिला मिठी मारली. या आनंदाच्या क्षणी त्यांनी तिला बेसन हलवा प्रेमाने भरवला.

 

नॅशनल अवॉर्ड स्वीकारताना यामी झाली भावूक

22 सप्टेंबर रोजी गुजरातच्या केवडिया मध्ये नॅशनल फिल्म अवॉर्ड्सदरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान केला. या क्षणाचे फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केले, तेव्हा ती बरीच भावूक झाली होती. इन्स्टावर फोटो शेअर करताना तिने एक लांबलचक पोस्टही लिहीली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us