AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yami Cameo : ‘धुरंधर: द रिव्हेंज’साठी यामी गौतमला मिळाली होती मोठी रक्कम ? अभिनेत्रीने सांगितलं सत्य !

Yami Cameo : आदित्य धरच्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ने बॉक्स ऑफिस पर धमालकेली होती. त्या चिक्रपटात यामी गौतमचाही कॅमिओ हता. आता त्यासाठी घेतलेल्या फीवरून यामीने मोठा खुलासा केला आहे.

Yami Cameo : ‘धुरंधर: द रिव्हेंज’साठी यामी गौतमला मिळाली होती मोठी रक्कम ? अभिनेत्रीने सांगितलं सत्य !
धुरंधरसाठी यामीने किती घेतली फी ?
| Updated on: Oct 16, 2026 | 2:25 PM
Share

Yami Cameo : आदित्य धरचा ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. त्याच्या बरोबरीने तर सोडाच, त्याच्या जवळपास जाणारी कमाई देखील इतर कोणताही चित्रपट करू शकलेला नाही. ‘हनुमान अंश’ चित्रपटाल जरी बराच फायदा झाला असला तरी, अद्याप टॉरवर रणवीर सिंगचाच चित्रपट आहे. जर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला असेल तर हे माहीत असेलच की या चित्रपटाच्या सुरूवातीलाच अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam) थँक्स म्हणत तिचे विशेष आभार मानले गेलेत. या चित्रपटात तिचा कॅमिओदेखील होता, ज्यामध्ये ती नर्स बनून, रणवीर सिंगच्या समोरचं त्याच्या शत्रूंचं काम संपवते. तिचा रोल, ती भूमिका अनेकांना आवडली होती. मात्र त्यानंतर अशा अनेक अफवा उठल्या होत्या की यामीने या चित्पटासाठी फी म्हणून मोठी रक्कम स्वीकारली. पण आता यावर यामीने मौन सोडलं असून कोणतीही फी घेतली नसल्याचं स्पष्ट केलं.

यामी गौतमचा ‘नई नवेली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच यामी ‘कोण होणार करोडपती’ या शोमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटातील आपल्या कॅमिओसाठी मानधन घेतलं होतं की नाही, याबाबत खुलासा केला.

फी बद्दल काय म्हणाली यामी ?

सोनी लिव्हच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर आगामी भागाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शोची होस्ट, माधुरी दीक्षित यामीला सांगते की तिने ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट पाहिला असून तिला तो खूप आवडला. यानंतर त्या चित्रपटातील यामीच्या कॅमिओचा तिने उल्लेख केला आणि तिला विचारलं की या भूमिकेसाठी तिला पैसे मिळाले होते की तिचे पती आदित्य धर यांनी केवळ चित्रपटात काम करण्याची विनंती केली होती?

यावर यामी गौतम म्हणाली, “ मी कुठेतरी वाचलं होतं की या कॅमिओसाठी मला खूप मोठा चेक मिळाला. पण ते वाचून मला प्रश्न पडला की, हे काय आहे? खरंतर मला असं वाटतं की, काही गोष्टी अनमोल असतात. आदित्यने मला सांगितलं की, ‘यामी, मला तू माझ्या चित्रपटात फक्त शुभशकुन म्हणून यावंस आणि तुझ्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित करावंस, असं वाटतं’. या चित्रपटात काम करताना मला खूप मजा आली. सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली काम करणं, हेच माझं मानधन होतं.” असं यामीने स्पष्ट केलं.

माधुरीने केली यामीची प्रशंसा

यानंतर माधुरी दीक्षितने यामी गौतमचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये तुला पाहणं खूप मजेशीर होतं”. दरम्यान, या चित्रपटात यामीने शाजिया बानो ही छोटीशी भूमिका साकारली आहे. ती एक नर्स दाखवली असून, प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेली भारतीय गुप्तहेर असते. आपल्या छोट्याशा भूमिकेतूनही यामीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

Follow Us
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?