AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही कठीण निर्णय घेतोय…; रणवीरच्या ‘धुरंधर 2’ला घाबरून ‘टॉक्सिक’बद्दल यशचं मोठं पाऊल

'टॉक्सिक' या बिग बजेट चित्रपटाबाबत 'केजीएफ' स्टार यशने मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या 19 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता.

आम्ही कठीण निर्णय घेतोय...; रणवीरच्या 'धुरंधर 2'ला घाबरून 'टॉक्सिक'बद्दल यशचं मोठं पाऊल
Ranveer Singh and YashImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 1:34 PM
Share

मार्च महिन्यात दोन मोठ्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस टक्करची जोरदार चर्चा होती. एकीकडे रणवीर सिंहचा ‘धुरंधर 2’ आहे तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होते. परंतु एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर कोणाला तरी त्याचा फटका निश्चितच बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच मध्य पूर्वेतील युद्धाची परिस्थिती उद्भवली आणि सगळंच गणित फिस्कटलं. या सर्व गोष्टींचा विचार करून यशने एक पाऊल मागे घेतलं आहे. सोशल मीडियावर त्याच्या टीमने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी मोठी अपडेट जाहीर केली आहे.

‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन अप्स’ हा चित्रपट आम्ही जगभरातील प्रेक्षकांसाठी बनवला आहे. कन्नड आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये या चित्रपटाचं शूटिंग केलं असून भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांना जोडण्याच्या हेतूने त्याची निर्मिती केली आहे. अनेक वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर आम्ही हा चित्रपट 19 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी उत्सुक होतो. परंतु आताची परिस्थिती पाहता, खासकरून मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या हेतूमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे आम्ही कठीण पण अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा चित्रपट जगभरात 4 जून 2026 रोजी इंग्रजी आणि भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

टॉक्सिक या चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू मोहनदास यांनी केलं असून व्यंकट के. नारायण आणि यश यांनी त्यांच्या ‘केव्हीएन प्रॉडक्शन्स’ आणि ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’ या बॅनरखाली त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात यश, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशच्या करिअरमधील हा 19 वा चित्रपट असून ‘केजीएफ’च्या सीरिजनंतरचा हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाचं शूटिंग इंग्रजी आणि कन्नड भाषेत एकाच वेळी पार पडलंय. परंतु इतर दाक्षिणात्य भाषा आणि हिंदीतही तो प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्यानेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला.

Delhi Metro: मोठी बातमी! दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंद, पुढील आदेशापर्यंत मेट्रोला ब्रेक; बंदोबस्तही वाढला

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report.

मिळेल ते खाल्लं, जागा दिसेल तिथे झोपले, रात्रीपासून पहाटे पर्यंत काय काय घडलं? जंतरमंतरवरचा विशेष Ground Report

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?.

CJP Protest: दिल्लीत आंदोलनांचं सत्र, बंगालमधून CRPF च्या 20 तुकड्या दाखल, काय मोठी घडामोड?

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन….

Nalasopara Crime : त्या बिल्डींगमध्ये सुरू होता भलताच प्रकार, टीप मिळताच पोलीसांनी टाकला छापा अन…