AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वांचीच जळाली.., ‘धुरंधर 2’वरून कॉमेडियनचा बॉलिवूडला टोला; म्हणाला “बॉम्ब ल्यारीमध्ये फुटले, धूर मात्र..”

नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध कॉमेडियन जाकिर खान याने 'धुरंधर 2'च्या यशावरून बॉलिवूडवर निशाणा साधला आहे. या चित्रपटामुळे सर्वांचीच जळाली आहे, असं थेट त्याने म्हटलंय. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सर्वांचीच जळाली.., 'धुरंधर 2'वरून कॉमेडियनचा बॉलिवूडला टोला; म्हणाला बॉम्ब ल्यारीमध्ये फुटले, धूर मात्र..
Zakir Khan on Dhurandhar 2Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2026 | 3:25 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडतोय. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 18 दिवसांत छप्परफाड कमाई करत इतिहास रचला आहे. अठराव्या दिवशी हा चित्रपट 1000 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला असून भविष्यात कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘धुरंधर 2’ हा कमाईच्या बाबतीतही धुरंधर ठरत असला तरी काहीजण त्यावर ‘प्रोपगेंडा’ (प्रचारकी) असल्याची टीका करत आहेत. आता कॉमेडियन जाकिर खान याने ‘धुरंधर 2’च्या यशावरून बॉलिवूडमधल्या अनेकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. “धुरंधरच्या यशाने सर्वांचीच जळाली आहे”, अशा शब्दांत त्याने निशाणा साधला आहे.

रविवारी पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026’मध्ये जाकिर खान, आलिया भट्ट आणि सुनील ग्रोवर यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. या पुरस्कार सोहळ्यातील बरेच फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक क्लिक जाकिर खानचा असून यामध्ये तो ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2‘च्या ब्लॉकबस्टर यशावरून बॉलिवूडवर उपरोधिक टोला लगावल्याचं दिसून येत आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले आहेत.

पहा व्हिडीओ-

या क्लिपमध्ये जाकिर म्हणताना दिसतोय, “तुम्ही कितीही शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट लिहिल्या, कितीही स्टोरी पोस्ट केल्या, कितीही मुलाखतीत सांगा की हा माझा आवडता चित्रपट आहे, परंतु सत्य हेच आहे की धुरंधरमुळे सर्वांचीच जळाली आहे. बम फिल्म में फुटे ल्यारी में पर धुआं उडा है ब्रांदा से जुहू में (चित्रपटात ल्यारीमध्ये बॉम्ब फुटले आहेत, पण त्याचा धूर वांद्र्यापासून जुहूपर्यंत पोहोचला आहे.)” जाकिरच्या या क्लिपवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘हे सत्य आहे, ज्यावर कोणीच हसत नाहीये’, असं एकाने लिहिलंय. तर ‘जाकिर खान फॅक्ट्स (तथ्ये) सांगतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘प्रेक्षक फक्त दिखावा करत आहेत, परंतु त्यांचा खरा चेहरा ते लपवू शकत नाहीत’, अशीही प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘जे जसं आहे, त्याला तसं बोलण्याची हिंमत याच्यात आहे’, अशा शब्दांत काहींनी जाकिरचं कौतुक केलं आहे.

Follow Us
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई