AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात ‘या’ दोन मराठी चित्रपटांचा डंका; प्रेक्षकांनीही उचलून घेतलं डोक्यावर

झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून यंदा दोन मराठी चित्रपटांनी त्यात आपली विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटांनी तीन ते चार विविध श्रेण्यांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. हे कोणते चित्रपट आहेत, ते जाणून घ्या..

झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात 'या' दोन मराठी चित्रपटांचा डंका; प्रेक्षकांनीही उचलून घेतलं डोक्यावर
Marathi MoviesImage Credit source: Youtube
| Updated on: Feb 25, 2026 | 12:42 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीचा मानाचा आणि दिमाखदार सोहळा म्हणजे ‘झी चित्रगौरव पुरस्कार 2026’ . यंदा हा पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘मराठी गाजलंच पाहिजे’ या विशेष थीमवर आधारित या वर्षीच्या सोहळ्यात मराठी संस्कृतीचा ठसा, परंपरेचा अभिमान आणि आधुनिकतेची सुंदर सांगड अनुभवायला मिळाली. संपूर्ण मंचावर मराठीचा आवाज घुमला आणि मराठी कलेचा सन्मान अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करत अनेक मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा दोन मराठी चित्रपटांनी हा पुरस्कार सोहळा गाजवला. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षक-समिक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

दिलीप प्रभावळकर यांच्या ‘दशावतार’ या चित्रपटाने ‘ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर’चा पुरस्कार आपल्या नावे केला असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांच्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही या दोन्ही चित्रपटांमधील कलाकारांमध्ये विभागून देण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर आणि भरत जाधव यांनी हा पुरस्कार जिंकला आहे. ‘दशावतार’ने 3 तर ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाने 4 पुरस्कार पटकावले आहेत.

पुरस्कार विजेत्यांची यादी-

    • ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर – दशावतार
    • सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – दिग्दर्शन – संतोष डावखर – गोंधळ
    • सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – अभिनेत्री – नंदिनी चिकटे – स्थळ, साजिरी जोशी – एप्रिल मे ९९
    • सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण – अभिनेता – तारानाथ खिरटकर – स्थळ
    • सर्वोत्कृष्ट अनुरुप जोडी – ललित प्रभाकर, हृता दुर्गुळे
    • MOST WATCHED ORIGINAL SERIES ON MARATHI Z5 (झी 5 वर सर्वाधिक पाहिला गेलेला सिनेमा) – दशावतार
    • सर्वोत्कृष्ट चित्रपट – आता थांबायचं नाय !
    • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अमृता सुभाष – जारण
    • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – शिवराज वायचळ – आता थांबायचं नाय !
    • सर्वोत्कृष्ट अभिनेता – दिलीप प्रभावळकर – दशावतार, भरत जाधव – आता थांबायचं नाय !
    • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सिद्धार्थ जाधव – आता थांबायचं नाय !

यंदाच्या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाय’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधलं. विविध श्रेणींमध्ये या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला. झी चित्रगौरव पुरस्कार 2026 हा केवळ पुरस्कार सोहळा नसून मराठी संस्कृतीचा, परंपरेचा आणि कलेचा उत्सव ठरला. ‘मराठी गाजलंच पाहिजे’ हा संदेश अधिक ठामपणे देत हा सोहळा प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला. मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विश्वास या सोहळ्याने पुन्हा एकदा दृढ केला. हा भव्य सोहळा प्रेक्षकांना शनिवारी 14 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

Follow Us
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट