Zeenat Aman : 3 अफेअर, पहिल्या पतीकडून मारहाण, दुसरं लग्न म्हणजे नरकयातना; वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली बॉलिवूड हसीना
Bollywood Actress : बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. तिच्या पहिल्या पतीनं तिला मारहाण केलेली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीची चित्रपट कारकीर्द शानदार होती, पण तिचं आयुष्य खडतर होतं. तीन अफेअर आणि दोन लग्न होऊनही, तिचं आयुष्य नरक बनलं होतं. ही अभिनेत्री म्हणजे झीनत अमान. झीनत अमान यांचं नाव अनेकांसोबत जोडले गेलं. कधी त्या देव आनंद यांच्यासोबतच्या कथित अफेअरमुळे, तर कधी राज कपूर यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत होत्या. इतकंच नाही, तर काही वृत्तांनुसार, त्यांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाही डेट केलं होतं.
पहिल्या पतीनं मारहाण केली
झीनत अमान संजय खानसोबतच्या लग्नामुळे सर्वाधिक चर्चेत होत्या. त्या दोघांनी गुपचूप लग्न केलं. त्यावेळी संजय खान आधीच विवाहित होते. त्यांचं लग्न फक्त एक वर्ष टिकलं. एकदा संजय यांनी झीनत यांना हॉटेलच्या खोलीत बेदम मारहाण केली होती. त्यावेळी त्याची पहिली पत्नीही तिथे उपस्थित होती.
संजय खानपासून विभक्त झाल्यानंतर, झीनत अमान यांनी मजहर खानसोबत लग्न केलं, ज्यांच्यापासून अभिनेत्री दोन मुलं झाली. मात्र, अभिनेत्रीनं एकदा म्हटलं होतं की, मजहरसोबतचं तिचं लग्न हीसुद्धा एक चूक होती. एका पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणालेली की, ‘गवाही’ सिनेमाचं शूटिंग १९८८ मध्ये झालं, माझ्या पहिल्या मुलाच्या, अझानच्या जन्मानंतर दोन वर्षांनी आणि माझ्या दुसऱ्या मुलाच्या प्रेग्नन्सीच्या अगदी आधी. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर, माझ्या करिअरच्या शिखरावर असताना मी माझ्या मनात रंगवलेलं कौटुंबिक सुखाचं गुलाबी चित्र फिकं पडू लागलं होतं.’
‘लग्न आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या होत्या, पण माझ्या वैवाहिक नात्यात तडे जाऊ लागले होते. मी दक्षिण मुंबईतील माझ्या आईच्या फ्लॅटमध्ये राहत होते, तेव्हा अचानक एके दिवशी माझ्या दारात एक चित्रपटाची पटकथा आली. तो आयन रँड यांच्या ‘द नाईट ऑफ जानेवारी 16’ या नाटकावर आधारित एक कमी बजेटचा कोर्टरूम ड्रामा होता आणि निर्माते विवेक वासवानी व नवोदित दिग्दर्शक अनंत बलानी यांनी तो मला उत्कृष्टपणे समजावून सांगितला होता.’ वैयक्तिक आयुष्यात त्रास सहन केल्यानंतर त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी अभिनेत्रीनं हा सिनेमा स्वीकारला.
सीमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत झीनत अमान म्हणालेल्या की, मजहर खान पेनकिलर आणि इतर औषधांच्या व्यसनात अडकला होता. एके वेळी, तो दिवसातून सात गोळ्या घेऊ लागला होता. त्यानंतर अभिनेत्याला किडनीचा त्रास झाला. अभिनेत्रीनं नवऱ्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो ऐकला नाही. त्यामुळे तिनं पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. सासरच्यांनी अभिनेत्रीला खूप त्रास दिला. इतकंच नाही तर त्यांनी झीनत यांना मजहर खानच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासही नकार दिला.