AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 हजार कोटीचा मालक बोलता बोलता गेला… अजित पवारांबाबत गुलाबराव पाटलांच विधान, असं का म्हणाले?

अजित पवारांसाारख्या माणसाला देवानं नेलं, काय करु शकतो. त्यांना कशाची कमी होती, सकाळी ६.३० वाजता माणूस टेबलावर असायचा. ५० हजार कोटींचा मालक होता, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

50 हजार कोटीचा मालक बोलता बोलता गेला... अजित पवारांबाबत गुलाबराव पाटलांच विधान, असं का म्हणाले?
Shivsena Minister Gulabrao Patil On Ajit PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 9:52 PM
Share

अजित पवारांसारखा सोन्यासारखा माणूस बोलता बोलता गेला, दादांच्या जाण्यानं राज्याचं मोठं नुकसान झालं, असं शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबरावल पाटील यांनी म्हटलं आहे. ते जळगावमधील एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते.  अजित दादांचा आणि माझा पक्ष वेगवेगळा होता पण माणूस मला आवडायचा. दादांना काय कमी होतं, ते ५० हजार कोटींचे मालक होते. बोलेल तशी सत्ता होती, वाटेल तसं काम करणारा नेता होता. सकाळी साडे सहा वाजता टेबलावर बसून काम करणारा नेता होता, शेवटी देवानं नेलं, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सध्या कार्यकर्त्यांशी भेटीगाठी सुरु आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?

अजितदादा सारखा सोन्या सारखा माणूस बोलता बोलता गेला… अर्धा मिनिट चुकला आणि आपल्या राज्याचे केवढ मोठे नुकसान झाले. माझा आणि त्यांचा पक्ष वेगवेगळा होता. पण माणूस मला आवडायचा. पार्ट्याचे राजकीय पक्ष काय खरं राहिलं नाही आता, दर चार महिन्यांनी विचारावे लागते, कोणत्या पार्टीत होता. मी तर बाबा खुश राहतो जे होणार आहे ते कोणी टाळू शकत नाही. काय कमी होती आमच्या दादांना, ५० हजार कोटींचा मालक होता. बोलेल तशी सत्ता होती, वागेल तसा काम करणारा होता. सकाळी 6 वाजता उठून काम करणारा नेता होता, पण शेवटी देवाने नेले.

आर आर पाटील यांच्याबद्दलही केलं वक्तव्य

आर. आर. आबा कोणत्या पक्षाचे होते यांच्याशी मला घेण देणं नाही. पण ज्यांनी चांगले निर्णय घेतले ते मान्यच केलं पाहिजे. झोपडीतला, वाड्या वस्त्यावरचा प्रत्येक मुलगा पोलीस झाला, याचा श्रेय द्यायचं म्हटलं तर ते फक्त आणि फक्त आर आर आबा यांचे आहे. मंत्री याबरोबरच मी एक माणूस आहे, माणसाने माणसाला मदत करावी, असे बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे. बाबासाहेब नसते तर माझ्यासारखा ओबीसी माणूस मंत्री झाला नसता. बारिश ना होती तो खेती ना होती, बाबासाहेब ना होते तो समता ना होती, असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?