AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP Meeting: शरद पवार- पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे नेते एकत्र; बैठकीत काय घडलं? INSIDE स्टोरी समोर

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले.   या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

NCP Meeting: शरद पवार- पार्थ पवारांसह राष्ट्रवादीचे नेते एकत्र; बैठकीत काय घडलं? INSIDE स्टोरी समोर
| Updated on: Nov 07, 2026 | 9:48 PM
Share

NCP Meeting:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख, ज्येष्ठ नेते शरद पवार  रुग्णालयात दाखल झाल्यापासून शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यातील नेते गर्दी करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हेंसह अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले.   या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे? 

“साहेबांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. साहेबांच्या प्रकृतीची ही चौकशी होती. साहेबांची प्रकृती अगदी छान आहे, त्यामुळे साहेबांनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. दिवाळीनिमित्त ही भेट होणार होती, साहेबांची प्रकृती छान आहे. गप्पांमध्ये विषय निघत गेले. त्यामुळे त्या गप्पा रंगल्या होत्या. दिवाळीनिमित्तचं आम्ही सर्वजण साहेबांना भेटलो,” असं अमोल कोल्हे म्हणाले.

“साहेबांची प्रकृती छान आहे. महाराष्ट्रात साहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आनंद द्विगुणित व्हावा अशीही बातमी आहे. मात्र पार्थ पवार यांच्याशी माझी भेट झाली नाही, मला तर ते दिसले नाहीत. माझ्या साहेबांशी गप्पा झाल्या. विलिकरणाच्या फक्त माध्यमात चर्चा आहेत. या बातम्यांबाबत काहीही चर्चा झाली नाही. आतमध्ये सर्व ज्येष्ठ नेते एकत्र होते अन् गप्पांची मैफिल रंगली होती,” असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

दोन्ही राष्ट्रवादीत शिजतंय काय? 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर आला आहे. सुनील तटकरे यांचे विधान त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट या सर्व घडामोडींमुळे विलिनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अशातच आता पार्थ पवार यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीमध्ये नेमकं शिजतंय काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?