AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FEATURED

इंडोनेशिया आणि वनतारा यांच्यात वन्यजीव संवर्धनासाठी मोठी भागिदारी

इंडोनेशियातील वन्यजीवांच्या आरोग्यसेवा आणि नैसर्गिक अधिवासातील संवर्धनाला (In-situ Conservation) बळ देण्यासाठी इंडोनेशिया सरकार आणि वनतारा यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. इंडोनेशियाचे वनमंत्री राजा जुली अँटोनी यांनी जकार्ता येथे पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा केली. या भागीदारीला अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनतारासोबत इंडोनेशियातील Fauna Land Group सहकार्य करणार आहे. या उपक्रमांतर्गत इंडोनेशियातील वन्यजीव […]

इंडोनेशिया आणि वनतारा यांच्यात वन्यजीव संवर्धनासाठी मोठी भागिदारी
| Updated on: Aug 24, 2026 | 7:01 PM
Share

इंडोनेशियातील वन्यजीवांच्या आरोग्यसेवा आणि नैसर्गिक अधिवासातील संवर्धनाला (In-situ Conservation) बळ देण्यासाठी इंडोनेशिया सरकार आणि वनतारा यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. इंडोनेशियाचे वनमंत्री राजा जुली अँटोनी यांनी जकार्ता येथे पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा केली.

या भागीदारीला अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनतारासोबत इंडोनेशियातील Fauna Land Group सहकार्य करणार आहे. या उपक्रमांतर्गत इंडोनेशियातील वन्यजीव आरोग्यसेवा पायाभूत सुविधा, पशुवैद्यकीय सेवा आणि क्षेत्रीय पातळीवरील क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

हत्तींच्या उपचारासाठी विशेष प्रशिक्षण

या कार्यक्रमाची सुरुवात वन्यजीव व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी, पशुवैद्य आणि हत्तींच्या देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाने होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर वन्यजीवांच्या उपचार आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार आहे.

10 ‘हॉस्पिटल्स ऑन व्हील्स’ची घोषणा

भागीदारीतील महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये 10 ‘हॉस्पिटल्स ऑन व्हील्स’ सुरू करण्याचा समावेश आहे. ही फिरती रुग्णालये इंडोनेशियातील वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वापरली जातील.

वे कंबास हत्ती रुग्णालयाचे अद्ययावतीकरण

इंडोनेशियातील प्रसिद्ध Way Kambas Elephant Hospital चे अत्याधुनिक Elephant Treatment and Care Centre मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या केंद्रात आधुनिक उपकरणे, उपचारासाठी आवश्यक साधने आणि नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अद्ययावत केंद्रामुळे मानवी देखरेखीखाली असलेल्या 62 सुमात्रन हत्तींसह आसपासच्या परिसरातील जवळपास 100 जंगली सुमात्रन हत्तींच्या आरोग्यसेवेला मदत होणार आहे.

वन्यजीव संवर्धनासाठी व्यापक सहकार्य

या उपक्रमाचा केंद्रबिंदू इंडोनेशिया सरकार आणि वनतारा यांच्यातील विद्यमान सामंजस्य करार (MoU) आहे. या कराराच्या माध्यमातून वन्यजीव आरोग्य, पशुवैद्यकीय सेवा, प्राणी कल्याण, संवर्धन प्रजनन, पुनर्वसन, पुनर्वन्यीकरण (rewilding) आणि क्षमता विकास अशा विविध क्षेत्रांत सहकार्य केले जाणार आहे.

या भागीदारीअंतर्गत वनतारा पशुवैद्यकीय तज्ज्ञता, प्राणी देखभाल, संवर्धनाचा अनुभव, तांत्रिक मदत, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देणार आहे. हे काम इंडोनेशिया सरकार, संबंधित राष्ट्रीय संस्था आणि Fauna Land यांच्या समन्वयाने केले जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय संवर्धन क्षेत्रात वनताराचा विस्तार

वनताराने जामनगर येथील आपल्या सुविधेत विकसित केलेली वन्यजीव आरोग्य, पशुवैद्यकीय सेवा आणि प्राणी देखभालीची तज्ज्ञता आता आंतरराष्ट्रीय संवर्धन उपक्रमांसाठीही उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. इंडोनेशियासोबतची ही भागीदारी त्याचाच महत्त्वाचा भाग असल्याचे प्रेस रिलीजमध्ये नमूद करण्यात आले आहे.

इंडोनेशिया सरकार आणि वनतारा पुढील काळात देशाच्या राष्ट्रीय संवर्धन प्राधान्यक्रमांनुसार आणि लागू कायदे व धोरणांच्या चौकटीत या सहकार्याचा विस्तार करणार आहेत.

Disclaimer: हा एक Sponsored लेख आहे. यात दिलेली माहिती आणि दावे जाहिरात देणाऱ्या कंपनीचे आहेत. TV9Marathi.com या लेखातील माहिती आणि दाव्यांना जबाबदार नाही. कोणत्याही माहितीचा वापर करण्यापूर्वी तुम्ही स्वत: त्याची खात्री करून घ्या.
Follow Us
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी...
29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? जरांगे पाटलांनी दिली सर्वात मोठी अपडेट
आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन...
Amravati : आरोग्यमंत्री आबिटकरांचा मृत बालकांच्या पालकांशी संवाद, समिती स्थापन करण्याची घोषणा
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकार सकारात्मक? विखे पाटलांनी दिला सर्वात...
मनोज जरांगेंच्या मागणीवर सरकारा मोठा निर्णय? विखे पाटलांनी दिला सर्वात मोठा संकेत, दोन-तीन दिवसांत...
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं
सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत...केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; 19 जणांवर गुन्हा दाखल!
रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा अंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच...
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...