AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

..म्हणूनच गौतमीचे आहेत लाखो चाहते, होळीच्या सणामधील त्या व्हिडीओची प्रचंड चर्चा, होतय प्रचंड कौतुक, Video

राज्यात मोठ्या प्रमाणात होळीचा उत्साह बघायला मिळाला. मात्र, यामध्ये सर्वात चर्चेत आली ती म्हणजे गौतमी पाटील. तिचा एका व्हिडीओ लाखो चाहत्यांची मने जिंकली.

..म्हणूनच गौतमीचे आहेत लाखो चाहते, होळीच्या सणामधील त्या व्हिडीओची प्रचंड चर्चा, होतय प्रचंड कौतुक, Video
| Updated on: Mar 04, 2026 | 2:08 PM
Share

Gautami Patil : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. पण अशातच आता गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. काय आहे त्या व्हिडीओमध्ये? पाहूयात सविस्तर

राज्यासह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगपंचमी आणि होळीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना ठाण्यातही जल्लोषात होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण, ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर डान्स आणि जल्लोषात सहभागी झालेली तरुणाई असा उत्साही माहोल ठाण्यातील विविध भागांत पाहायला मिळाला.

ठाण्यातील पारसिक नगर परिसरात होळी निमित्त खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात लाखो चाहत्यांची क्रश आणि प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील ही देखील उपस्थित राहिली होती. तिच्या आगमनाने कार्यक्रमाला एक वेगळाच रंग आला.

यावेळी गौतमी पाटीलने उपस्थितांसोबत रंग खेळत होळीचा आनंद लुटला. रंगांची उधळण करत तिने तिथे जमलेल्या चाहत्यांशी संवाद देखील साधला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गाण्यांच्या तालावर अनेकांनी डान्स करत उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील हजेरी लावली होती. जितेंद्र आव्हाड कार्यक्रमस्थळी पोहोचताच उपस्थितांनी त्यांचे धुमधडाक्यात स्वागत केले.

गौतमी पाटीलने त्यांना पाहताच नम्रपणे त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही तिला रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर चर्चा

गौतमी पाटीलच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या साधेपणाचे आणि नम्र स्वभावाचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याचे आणि डान्सचे कौतुक केले आहे. काही वेळातच या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले.

ठाण्यातील पारसिक नगर परिसरात साजऱ्या झालेल्या या होळी उत्सवाने रंग, उत्साह आणि सेलिब्रिटी उपस्थितीमुळे विशेष लक्ष वेधून घेतले. सध्या या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून होळीच्या आनंदात आणखी भर पडत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...