पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा आकर्षक सूर्यमंदिराचा देखावा

पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचं हे 127 वं वर्ष आहे. त्यानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे.

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने यंदा आकर्षक सूर्यमंदिराचा देखावा

पुणे : गणेशोत्सव आता केवळ एका दिवसावर येऊन ठेपला आहे. उद्या (2 सप्टेंबर) बाप्पा विराजमान होणार आहेत (Ganesha Festival 2019). बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण राज्यभरात उत्साहात तयारी सुरु आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचं हे 127 वं वर्ष आहे (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Trust completed 127 years). त्यानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. सोमवारी (2 सप्टेंबर) सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडे आठ वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. फुलांनी साकारलेले 21 नाग रथावर लावण्यात येणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे.

सोमवारी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानंतर दुपारी साडे बारा वाजता भाविकांसाठी दर्शन सुरू होणार आहे. तसेच, ट्रस्टच्या वतीने कोल्हापूरमधील एक पूरग्रस्त गाव दत्तक घेतले जाणार आहे. अशी माहिती मंदिराचे ट्रस्टी महेश सूर्यवंशी यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी पुणे पोलीस सज्ज

11 दिवसाच्या गणेशोत्सवादरम्या सुरक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उदभवू नये, म्हणून शहरात सात हजार पोलीस बंदोबस्तावर असणार आहे. शहरातीलच नाही, तर बाहेरुन पोलिसांची वाढीव कुमक मागवली जाणार आहे.

शहरात एकूण 3,245 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. या मंडळांसोबत पुणे पोलिसांनी नुकतीच बैठक घेतली. त्यानुसार, शहरात बंदोबस्त लावला जाणार आहे. शिवाय, बॉम्बशोधक पथक, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पथक आणि ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील अकरा दिवस शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याचं पोलीस सहआयुक्त राजेंद्र शिसवे यांनी सांगितलं.’

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *