मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू

मुंबई : मायानगरी मुंबईची लाफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी 12 जणांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झालाय. शिवाय पाच जण या घटनांमध्ये जखमी झाले आहेत. लोहमार्ग पोलिसांनी काढलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. कल्याण आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या क्षेत्रात सर्वात जास्त बळी गेले आहेत. कल्याण आणि ठाण्यात प्रत्येकी तीन प्रवाशांचा मृत्यू …

मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू

मुंबई : मायानगरी मुंबईची लाफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी 12 जणांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झालाय. शिवाय पाच जण या घटनांमध्ये जखमी झाले आहेत. लोहमार्ग पोलिसांनी काढलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

कल्याण आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या क्षेत्रात सर्वात जास्त बळी गेले आहेत. कल्याण आणि ठाण्यात प्रत्येकी तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर डोंबिवली, कुर्ला, वडाळा, वांद्रे, मुंबई सेंट्रलमध्येही एकूण दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. यापैकी सहा प्रवाशांची ओळख अजूनही पटलेली नाही.

सोमवार हा आठवड्यातील कामकाजाचा पहिलाच दिवस असतो. त्यामुळे सोमवारी जास्त गर्दी असते. हीच गर्दी जीवघेणी ठरते. प्रवाशांचा बेजबाबदारपणाही याला कारणीभूत ठरतो. धावती लोकल पडकणे, किंवा धावत्या लोकलमधून उतरणे आणि रेल्वे रुळ ओलांडणे अशा गोष्टींमुळे अपघात होतात.

सर्वाधिक मृत्यू हे रेल्वेरुळ ओलांडताना आणि धावती लोकल पकडताना झाले आहेत. दररोज लाखोंचं ओझं वाहणाऱ्या मुंबई लोकलच्या अपघातात दरवर्षी तीन हजारपेक्षा जास्त प्रवाशांचे बळी जातात. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झालं आहे.

कोणत्या वर्षात किती मृत्यू?

2017 या वर्षात एकूण 3014 मृत्यू झाले, ज्यात रेल्वे रुळ ओलांडताना 1651,  धावत्या ट्रेनमधून पडल्याने 654, लोकलच्या धडकेत 12 आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकून 18 जणांनी आपला जीव गमावला.

2016 मध्ये एकूण 3202 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वे रुळ ओलांडताना 1798, धावत्या ट्रेनमधून पडल्याने 657, लोकलच्या धडकेत 8, रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकून 13 जणांचा मृत्यू झाला.

शिवाय 2015 मध्येही 3304 जणांचा लोकल रेल्वेच्या अपघातात जीव गेला. रेल्वे रुळ ओलांडताना 1801, धावत्या ट्रेनमधून पडल्याने 806, लोकलच्या धडकेत 13 आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकून 40 जणांचा मृत्यू झालाय.

रेल्वे प्रशासन आणि आरपीएफकडून हे अपघात टाळण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे रुळ ओलांडताना पाहिल्यास किंवा स्टंटबाजी करताना दिसल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. पण तरीही यातून कोणताही धडा घेतला जात नाही. अनेकदा स्टंटबाजी करणारांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लावलेली शिस्त पाळणं आणि स्वतः नियमांबाबतीत जागरुक बनणं हाच हे अपघात रोखण्यासाठीचा एकमेव उपाय आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *