मुंबई महापालिकेत भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा, नव्या फेरबदलासह भाजपची सेनेला टक्कर

शिवसेनेला मुंबई महापौर पदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली (Mumbai BMC 2022 Election) होती.

मुंबई महापालिकेत भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा, नव्या फेरबदलासह भाजपची सेनेला टक्कर
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 8:50 PM

मुंबई : राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपनं आता मिशन बीएमसी 2022 वर लक्ष केंद्रीत केलं (Mumbai BMC 2022 Election) आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महापालिकेत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आता भाजप सज्ज झाली आहे. यासाठी महापालिकेत भाजपनं मोठे फेरबदल केले आहेत. आतापर्यंत पहारेकऱ्यांच्या भुमिकेत असणाऱ्या भाजपनं आता विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत सेना भाजप सामना पाहायला मिळणार (Mumbai BMC 2022 Election) आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आपला महापौर बसवण्याचा निर्धार केलेल्या भाजपने बीएमसीमध्ये नव्या नियुक्ती केल्या आहेत. भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे हे आता मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीवर बसण्याची तयारी करत आहेत. तशी घोषणाही भाजपनं महापौरांना पत्र देऊन केली आहे. तर, खासदार झालेल्या मनोज कोटकांच्या जागी गटनेता म्हणून विनोद मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. त्यामुळे नव्या फेरबदलांसह भाजपची तोफ महापालिकेत धडाडताना दिसत आहे.

भाजपनं 2017 च्या महापलिका निवडणुकांनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही त्यावेळी विरोधी पक्षात बसणं टाळलं. त्यावेळी राज्यात भाजप-सेनेच्या युतीची सत्ता होती. मात्र ज्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी महापालिकेत भाजपनं शिवसेनेच्या विरोधात जाण्याच टाळलं, त्याच विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर राहावं (Mumbai BMC 2022 Election) लागलं.

त्यामुळे आता बदललेल्या गणितांसोबत भाजपची भुमिकाही बदलणार आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य गणेश खनकर यांना बाहेरचा रस्ता दाखवत पालिकेत प्रभारी म्हणून नेमणूक झालेल्या भालचंद्र शिरसाट यांना पालिकेत इन केलं जाणार आहे. त्यासाठी ही जागा खाली करण्यात आली आहे. शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजपची ही रणनीती असणार आहे.

“मुंबई महापालिकेत शिवसेना आक्रमक आहे. दुसरा कोणी आक्रमक होऊ शकत नाही. भाजपला धोबी पछाड फक्त शिवसेना देऊ शकते. त्यामुळे भाजपने किती फेरबदल केले तरी काही उपयोग नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी दिली आहे.

मात्र, भाजपनं विरोधी पक्ष म्हणून सध्या कितीही दंड थोपटले असले तरी विरोधी पक्षनेते पद भाजपच्या वाटेल येणार का? हा मोठा पेच आहे. तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसनं विरोधी पक्ष नेतेपद सोडल्याशिवाय भाजपला हे पद मिळणं कठीण (Mumbai BMC 2022 Election) आहे.

भाजपचा विरोधी पक्ष नेता होण्यास अडचणी काय??

यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं विरोधी पक्षनेते पद नाकारले होते आणि पहारेकऱ्याची भुमिका स्विकारली होती. त्यावेळी राज्यात भाजप- सेनेची युती होती. त्यामुळे तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसला हे पद मिळाले. त्यावेळी याबाबत न्यायिक सल्ला घेण्यात आला होता.

विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत हे पद भाजपला मिळणं कठीण आहे. 37IA , 37IA1 अनुसार गटनेता असलेला सदस्यच विरोधी पक्ष नेता म्हणून निवडला जातो. मात्र भाजपनं गटनेता आणि विरोधी पक्ष नेते पदासाठी दोन वेगवेगळी नावं दिली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर आता भाजपची हालचाल अवलंबून असेल.

राज्याप्रमाणेच जर काँग्रेस महापालिकेच्या सत्तेत सहभागी झाली. तरच भाजपचा विरोधी पक्षाचा मार्ग मोकळा होऊ (Mumbai BMC 2022 Election) शकतो.

तांत्रिकदृष्ट्या भाजपला अधिकृतरित्या विरोधी पक्ष नेता पद मिळाले नाही तरी, भाजप स्वयंघोषित विरोधी पक्ष म्हणून आक्रमक होण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात महापालिकेतील घोटाळे, गैरव्यव्हार बाहेर काढण्याची जबाबदारी अनुभवी नगरसेवकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर राज्यातील युतीच्या संसारासाठी थंडावलेला भाजप-सेनेतला कलगीतुरा पुन्हा एकदा पालिकेत पाहायला मिळेल.

गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी झाली नव्हती. शिवसेनेला मुंबई महापौर पदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला मदत केली (Mumbai BMC 2022 Election) होती.

मुंबई महापालिका संख्याबळ 

शिवसेना – 96 भाजप – 82 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी काँग्रेस – 8 समाजवादी पार्टी – 6 एमआयएम – 2 मनसे – 1 अभासे – 1

त्यामुळे येत्या 2 वर्षांत भाजपच्या मिशन बीएमसी 2022 ला शिवसेना टक्कर देते का आणि महापालिकेवरचा भगवा कायम ठेवते का? का इतर जिल्ह्याप्रमाणे तिन्ही पक्षांची महाविकासआघाडी पालिकेत होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार (Mumbai BMC 2022 Election) आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.