आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं प्रत्युत्तर

आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही 130 कोटी नागरिक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत हा एकतेचा संदेश!' असं राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटला कोट करुन लिहिलं आहे. (Ram Kadam answers Jitendra Awhad Nawab Malik)

आव्हाड-मलिक यांच्या मोदींवरील टीकेला राम कदम यांचं प्रत्युत्तर

मुंबई : ‘कोरोना’विरोधी लढ्यात एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे उजळण्याबाबत केलेल्या आवाहनावर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी टीका केली होती, त्याला भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवरुनच प्रत्युत्तर दिलं आहे. (Ram Kadam answers Jitendra Awhad Nawab Malik)

‘देश एका अवघड संकटाचा सामना करत असताना समस्त 130 कोटी देशवासी एकत्रितपणे या संकटाशी संघर्ष करत आहेत. या अंधकारमय परिस्थितीत तिमिराकडून प्रकाशाकडे जात असताना हातात आशेचा प्रकाशाचा दिवा घेऊन आम्ही 130 कोटी नागरिक या संकटाचा मुकाबला करायला एक आहोत हा एकतेचा संदेश!’ असं राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटला कोट करुन लिहिलं आहे.


‘आम्हाला वाटले, मोदी काहीतरी आधार देतील. काय उपाययोजना केल्या, याची माहिती देतील, किती औषधे, मास्क आहेत, डॉक्टरांना किती साहित्य देऊ, याची माहिती देतील. पण मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत. मोदी यांचा हा प्रयत्न निव्वळ मूर्खपणा आहे. लोकांच्या जीवनात अंधार आलाय, तो दूर करण्यासाठी मोदींनी प्रकाश देण्याची गरज होती’, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी ताशेरे ओढले होते.

हेही वाचा : दिवे पेटवण्यामागील मोदींच्या हेतूचं स्वागतच करायला हवं, रोहित पवार यांचा पाठिंबा

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या कोट्यवधी लोकांसाठी दिलेले मोफत धान्य कुठे गेले ?? दुर्दैवाने महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत एक किलोही मोफत धान्य कोणत्याही गरिबापर्यंत पोहोचवला नाही??’ असा थेट सवाल राम कदम यांनी नवाब मलिक यांच्या ट्वीटला कोट करुन विचारला आहे. (Ram Kadam answers Jitendra Awhad Nawab Malik)

‘वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील, परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देऊन गेले. सकाळी नऊ वाजता पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातून देशवासियांच्या पदरात घोर निराशा पडल्याची टीका नवाब मलिक यांनी केली होती.

दरम्यान, दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं, अशा शब्दात शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी एकप्रकारे पाठिंबा दर्शवला आहे. आधी जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केल्याने पक्षात दोन गट पडल्याचं चित्र आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा. त्यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करायची नाही, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

(Ram Kadam answers Jitendra Awhad Nawab Malik)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *