Live Update : राज्यात आज कोरोनाचे 2940 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 44,582 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यात आज कोरोनाचे 2940 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 44,582 वर
Picture

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 44,582 वर

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 44 हजार 582 वर, राज्यात आज 2940 रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 63 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या 1517 वर, राज्यात 857 रुग्णांना डिस्चार्ज, 12 हजार 583 एकूण बरे झालेल्यांची संख्या

22/05/2020,7:41PM
Picture

मुंबईहून आलेल्या आई-वडील आणि मुलीला उस्मानाबादेत कोरोना

उस्मानाबाद : उस्मानाबादेत दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह, वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील 2 रुग्ण पॉझिटिव्ह, मुंबई वरुन आलेल्या आई वडील आणि मुलीला कोरोनाची लागण, काल आला होता 6 वर्षीय मुलीचा अहवाल, उस्मानाबादेत रुग्णाचा आकडा 25 पार

22/05/2020,6:38PM
Picture

एपीएमसीतील आणखी 5 जणांना कोरोना, एकूण रुग्णांची संख्या 550 वर

नवी मुंबई : एपीएमसी मार्केटच्या 5 जणांना कोरोनाची लागण, 2 सुरक्षाकर्मी, 2 एपीएमसी कर्मचारी आणि संपर्कातील एकाला कोरोनाची लागण, स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला रिपोर्ट पोझिटिव्ह, एपीएमसी संबंधित एकूण रुग्णांची संख्या 550 वर, आतापर्यंत 7 जणांना मृत्यू

22/05/2020,6:34PM
Picture

नागपुरातील ग्रामीण भागात एसटीसेवा सुरु, सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान एसटी धावणार

नागपूर : आजपासून नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात एसटी सेवा सुरु, नागपूर शहर रेड झोनमध्ये असल्याने शहरात बसच्या फेऱ्या नाही, तालुका स्तरावर ग्रामीण भागात 114 फेऱ्या, एकूण 18 बसेस ग्रामीण भागातील नागरिकांच्या सेवेत, सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यानच एसटी धावणार

22/05/2020,6:33PM
Picture

पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांना कोरोनाची लागण, आकडा 254 वर

पिंपरी-चिंचवड : शहरात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण, 11 रुग्ण कोरोनामुक्त, आत्तापर्यंत शहरातील 254 रुग्णांना कोरोनाची लागण, तर शहरातील एकूण 153 रुग्ण कोरोनामुक्त

22/05/2020,6:27PM
Picture

20 रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करा, कांदा उत्पादकांचे पंतप्रधानांना पत्र

नाशिक : कांदा उत्पादकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, कांद्याला मिळणाऱ्या बाजार भावात उत्पादन खर्चही निघणं मुश्किल, सरासरी 5 ते 6 रुपये प्रतिकिलोला बाजार भाव, 20 रुपये किलो प्रमाणे खरेदी करत कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची पत्रात मागणी, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्याची मोहीम सुरु, राज्यातून 1 लाखाहून अधिक पत्र मोदींना पाठवणार

22/05/2020,6:18PM
Picture

पुण्यातील मार्केटयार्डमधील भुसार विभात 25 मेपासून सुरु होणार

पुणे : पुणे मार्केटयार्डमधील भुसार विभाग 25 मे पासून सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरु, फळे भाजीपाला विभागाबाबत मंगळवारी बैठक होऊन त्यानंतर निर्णय घेण्यात येणार, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 19 तारखेपासून भुसार विभाग बंद, 25 तारखेपासून नियम अटींचे पालन करुन मार्केटयार्ड मधील भुसार विभाग सुरु होणार

22/05/2020,6:14PM
Picture

अमरावतीत कोरोनाचा 14 वर बळी, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू

अमरावती : अमरावतीत कोरोनाचा चौदावा बळी, अमरावती शहरातील पाटीपुरा येथील 30 वर्षीय युवकाचा मृत्यू, अमरावतीत बळींची संख्या 14 वर, अमरावतीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 65 वर, उपचारार्थ दोन रुग्ण नागपूरला हलवले, कोरोनाग्रस्त एकूण रुग्णांची संख्या 141 वर

22/05/2020,6:13PM
Picture

नागपुरात आणखी दोघांना कोरोना, रुग्णांची संख्या 409 वर

नागपूर : नागपूरात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 409 वर, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 298 वर

22/05/2020,6:13PM
Picture

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी

22/05/2020,5:56PM
Picture

कराड शहर कोरोनामुक्त

कराड : कराडकरांसाठी दिलासादायक बातमी, कराड शहर कोरोनामुक्त, कराडमध्ये 7 जण कोरोनामुक्त, 7 जणांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह, टाळ्यांच्या गजरात रुग्णांना डिस्चार्ज, आजपर्यंत कराडमध्ये 89 कोरोनाबाधित रुग्ण बरे

22/05/2020,5:54PM
Picture

कोल्हापुरातील कोरोनाबधितांची संख्या 237 वर

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 9 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या पोहचली 237 वर

22/05/2020,5:51PM
Picture

22/05/2020,5:45PM
Picture

अमरावतीत कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण

अमरावतीत कोरोनाचे आणखी 2 नवे रुग्ण आढळले आहेत. अमरावतीत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे. तर 59 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 141 झाली आहे. तर 13 जणांचा आतापर्यंत कोरोनाने बळी गेला आहे.

22/05/2020,12:08PM
Picture

शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशाप्रकारच्या सर्व गरिबांसाठी ५० हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं -देवेंद्र फडणवीस

22/05/2020,12:04PM
Picture

असंघटीत कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,12:00PM
Picture

केंद्राचे पैसे राज्य सरकार खर्च करत नाहीय, रेशनही केंद्राने पुरवले : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,11:59AM
Picture

महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,11:58AM
Picture

केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,11:57AM
Picture

सर्व महानगरात कोरोनाचा कहर, मात्र राज्य सरकारची तयारी नाही : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,11:55AM
Picture

खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,11:54AM

Picture

राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग : देवेंद्र फडणवीस

22/05/2020,11:52AM

Picture

नागपुरात कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट 15 दिवसांवर

नागपुरात कोरोना रुग्णांचा डबलिंगरेट 15 दिवसांवर गेला आहे. नागपुरात 200 रुग्णांवरुन 400 रुग्णसंख्या व्हायला 15 दिवस लागले आहे. यापूर्वी 100 वरुन 200 रुग्ण व्हायला 11 दिवस लागले होते. आता रुग्ण डबलिंगचा काळ वाढून 15 दिवसांवर गेला आहे. रुग्ण डबलिंगचा काळ वाढल्याने नागपूरकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

22/05/2020,10:58AM

Picture

31 ऑगस्टपर्यंत ईएमआय पुढे ढकलण्यास सवलत : रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर

22/05/2020,10:53AM

Picture

जालन्यात पुन्हा 7 नवीन कोरोनाबाधित रुग्ण

जालन्यात आज पन्हा नवीन 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नुकतेच या रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. जालन्यात आता कोरोनाबधितांचा आकडा 51 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली.

22/05/2020,10:49AM
Picture

औरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 26 कोरोना रुग्णांची वाढ

ओरंगाबादमध्ये सकाळपर्यंत 26 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1212 वर पोहोचली आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

22/05/2020,10:46AM
Picture

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 11 वर

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 11 वर पोहोचली आहे. आष्टी येथील 24 वर्षीय तरुणीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तरुणी मुंबई येथे शिकत असून 15 मे रोजी वर्धा जिल्ह्यात आली होती. दोन दिवसांपासून वर्धेच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल होती. आज या तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

22/05/2020,10:43AM
Picture

कोल्हापूरमध्ये दिवसभरात 46 जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूरमध्ये दिवसभरात 46 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 228 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.

22/05/2020,10:32AM
Picture

कोल्हापूरमध्ये आजपासून दुकानं, मार्केट, रिक्षा सेवा सुरु होणार

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून दुकानं, मार्केट, रिक्षा सेवा सुरु होणार आहे. जिल्हाअंतर्गत भागात एसटीही धावणार आहे. तसेच सलून व्यवसायाला ही सशर्त परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

22/05/2020,10:28AM
Picture

मद्यविक्रीतून राज्याला 300 कोटींचा महसूल

मद्यविक्रीतून राज्याच्या महसुलात वाढ झाली आहे. 4 मे पासून 20 मे पर्यत राज्याला मद्यविक्रीतून 300 कोटींचा महसूल मिळाला आहे. मुंबई वगळता राज्याच्या बहुतांश भागात होम डिलिव्हरी सुरु आहे. होम डिलिव्हरीमुळं मद्यविक्रीत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

22/05/2020,10:24AM
Picture

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु होणार

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरु होणार आहे. प्रवासी घेऊन जाण्यासाठी लाल परी सज्ज झाली आहे. चालक वाहक प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच प्रमुख मार्गावर एसटी धावणार आहे. तर कोरोना रुग्ण असलेल्या पन्हाळा, राधानगरी शाहूवाडी तालुक्यात अद्याप परवानगी मिळालेली नाही.

22/05/2020,10:14AM
Picture

शहरातील खाजगी रुग्णालयांना आता कोरोना चाचणी सक्तीची

शहरातील खाजगी रुग्णालयांना आता कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. चाचणी केल्याशिवाय रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नाही. इतर कुठल्याही आजारावर उपचारासाठी आलात तरी चाचणी केली जाणार आहे.

22/05/2020,10:11AM
Picture

पुणे विभागातून आतापर्यंत एक लाख परप्रांतीय मुळगावी रवाना

पुणे विभागातून आतापर्यंत एक लाख परप्रांतीय मुळगावी रवाना झाले आहेत. सुमारे 77 रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून कामगार, मजुरांना रवाना करण्यात आले आहे. पुणे स्टेशनवरून 50 हजार कामगार, मजुरांना 39 रेल्वेने त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश या राज्यातील कामगार, मजूर होते.

22/05/2020,10:01AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

 

22/05/2020,9:58AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *