LIVE : निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

live update, LIVE :  निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
live update, LIVE :  निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक – निवडणुकीचे कामकाज आटोपून परतत असताना एका कर्मचाऱ्याचा हृयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. कृष्णा भरत सोनवणे असं या दुर्दैवी कर्मचाऱ्याचं नाव आहे. कृष्णा सोनवणे देवळाली कॅम्पला मराठा विद्याप्रसारक महाविद्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत होते. रात्री घरी परतत असताना पावणे बाराच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सोनवणे कुटुंबासह शिक्षक वर्गावर शोककळा पसरली आहे.

30/04/2019,2:25PM
live update, LIVE :  निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोल्हापुरात भीषण अपघात

कोल्हापूर : हरळी गावाजवळ पुन्हा भीषण अपघात, कंटेनर आणि कारची धडक, अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी, जखमींवर गडहिंग्लजमधील रुग्णालयात उपचार सुरु, गेल्या 10 दिवसात अपघाताची तिसरी घटना, यापूर्वी दोन अपघतात 9 जणांचा मृत्यू

30/04/2019,8:14AM
live update, LIVE :  निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

महाराष्ट्रातील चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के मतदान

राज्यात चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात संध्याकाळी सहापर्यंत अंदाजे 57 टक्के मतदान, राज्यात एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

30/04/2019,7:11AM
live update, LIVE :  निवडणुकीचं कामकाज आटोपून परतणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

गोरेगावच्या कामा इंड्रस्टीजवळ भीषण आग

करण जोहरच्या धर्मा प्रोड्क्शनला आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी रवाना, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

30/04/2019,7:05AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *