बालाकोटचा प्रचारच करायचा असता तर आणखी मोठा दारुगोळा वापरला असता : बीएस धानोआ

मुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उध्वस्त केलं होतं. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले होते. मात्र, या एअर स्ट्राईकनंतर वायू सेनेच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इतकंच नाही तर चीनने भारताला धमकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यासर्व प्रश्नांवर वायू सेनेचे एअर चीफ मार्शल बी.एस धानोआ …

बालाकोटचा प्रचारच करायचा असता तर आणखी मोठा दारुगोळा वापरला असता : बीएस धानोआ

मुंबई : पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उध्वस्त केलं होतं. यामध्ये अनेक दहशतवादी ठार झाले होते. मात्र, या एअर स्ट्राईकनंतर वायू सेनेच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. इतकंच नाही तर चीनने भारताला धमकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, यासर्व प्रश्नांवर वायू सेनेचे एअर चीफ मार्शल बी.एस धानोआ यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.

बालाकोटचा प्रचारच करायचा असता तर…

बी.एस धानोआ यांनी इंडिया टुडेशी बोलताना कारगिल युद्ध, बालाकोट, विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची वापसी आणि चीनच्या धमक्या या सर्व मुद्यांवर चर्चा केली. यावेळी धानोआ म्हणाले की, बालाकोट एअर स्ट्राईकचा प्रचार करण्याचं आमचं ध्येय नव्हतं. म्हणून आम्ही अधिक शक्तीशाली शस्त्रांचा वापर करणं टाळलं. जर आम्हाला याचा प्रचार करायचा असता तर आम्ही दहशतवाद्यांना मारण्यासाठी उच्च क्षमता असलेल्या शस्त्रांचा वापर केला असता. पण आम्हाला तिथल्या नागरिकांना नुकसान पोहोचवायचं नव्हतं, केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधायचा होता, त्यांची ठिकाणं उध्वस्त करायची होती. त्यामुळे आम्ही निवडक शस्त्रांचा वापर केला.

कारगिल युद्धादरम्यान छोट्या टार्गेटवर लक्ष्य साधणे कठीण होतं. पण आता ते अधिक सोपं झालं आहे, कारण आता आमच्याकडे मिराजसोबत UAV देखील आहे, असेही धानोआ म्हणाले.

बालाकोट एअर स्ट्राईक

बालाकोट एअर स्ट्राईकबाबत धानोआ म्हणाले, हल्ला करण्यापूर्वी आम्ही स्ट्राईक आणि हवेच्या दिशेचं विश्लेषण केलं होतं. आम्हाला माहीत होतं की पाकिस्तानी वायू सेना प्रत्युत्तर देईल. यासाठी आम्ही तयार होतो. आम्ही तेच केलं जे व्यवस्थितरित्या होऊ शकत होतं.

अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान उडवतील का?

विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आणि पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकबाबत धानोआ म्हणाले, जेव्हा तुम्ही स्वत:चा बचाव करत असता तेव्हा तुमचं नुकसान होणार नाही याची शाश्वती नसते. आमचा मुख्य उद्देश हा शत्रूंना त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ न देणे हा असतो. तुम्हाला यासाठी काय किंमत मोजावी लागू शकते हे तुम्ही ठरवू शकत नाही.

अभिनंदन हे पुन्हा लढाऊ विमान उडवू शकतील की नाही, यावर धानोआ म्हणाले, अभिनंदन हे नक्कीच पुन्हा विमान उडवतील. फक्त त्यापूर्वी त्यांना सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागतील. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावरच हे संभव होऊ शकतं.

बडगाम एअर क्रॅश

गेल्या 27 फेब्रुवारीला काश्मीरच्या बडगाम येथे Mi17 क्रॅश झालं होतं. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. याबाबत सध्या कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण व्हायची आहे, असं धानोआ यांनी सांगतिलं. सोबतच तिथे नेमकं काय झालं होतं, कसं झालं होतं, त्यामध्ये आमची काय चूक झाली होती, हे बघणं आवश्यक आहे. तसेच या चुकांपासून शिकण्याची गरज आहे, असंही धानोआ म्हणाले.

चीनच्या धमक्या

चीनकडून येणाऱ्या धमक्यांमध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. त्यावर भारतीय वायू सेना ही चीनला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं धानोआ यांनी सांगितलं. “आमच्याजवळ एअर फिल्डची संख्या चीनच्या तुलनेत अधिक आहे. चीनजवळ तितके एअर क्राफ्ट नाही. त्यांच्यातुलनेत आमच्याकडे आधुनिक एअर क्राफ्ट आहेत. जे चीनशी मुकाबला करण्यात सक्षम आहेत”, असं धानोआ यांनी सांगितलं.

VIDEO : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *