भारत आणि तालिबान पहिल्यांदाच आमने सामने

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी होणाऱ्या बैठकीत, भारत पहिल्यांदाच अतिरेकी संघटना तालिबानसोबत आमने सामने येणार आहे.रशियाने आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे. तीन दशकांपासून दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानच्या भवितव्याची चर्चा या बहुपक्षीय बैठकीत होणार आहे. या बैठकीमध्ये भारत पहिल्यांदाच तालिबानसोबत बातचीत करणार आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन रशियाने आयोजित केलेल्या बैठकीला तालिबानचे प्रतिनिधीही हजर राहणार आहेत. …

भारत आणि तालिबान पहिल्यांदाच आमने सामने

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी होणाऱ्या बैठकीत, भारत पहिल्यांदाच अतिरेकी संघटना तालिबानसोबत आमने सामने येणार आहे.रशियाने आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे. तीन दशकांपासून दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानच्या भवितव्याची चर्चा या बहुपक्षीय बैठकीत होणार आहे. या बैठकीमध्ये भारत पहिल्यांदाच तालिबानसोबत बातचीत करणार आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन रशियाने आयोजित केलेल्या बैठकीला तालिबानचे प्रतिनिधीही हजर राहणार आहेत. गेल्याच आठवड्यात रशियाने मॉस्को-प्रारुप बैठक 9 नोव्हेंबरला होणार असल्याची घोषणा केली होती.

या बैठकीला अफगाणिस्तानातील तालिबानचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याबाबत भारताच्या सहभागाबद्दल विचारलं असता, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, “मॉस्को इथं अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरुन एक बैठक होणार असल्याची माहिती आम्हाला आहे. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित व्हावी अशी भारताचीही इच्छा आहे.”

या बैठकीतील आमचा सहभाग अधिकृत नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

अफगाणिस्तानात शांती आणि एकता नांदावी यासाठी भारत शक्य ते सर्व सहकार्य करेल. अशा पद्धतीच्या बैठकांसाठी भारत नेहमीच सकारात्मक राहिला आहे, असं रवीश कुमार म्हणाले.

यापूर्वी ही बैठक 4 सप्टेंबरला नियोजित होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी अफगाण सरकारने या बैठकीतून माघार घेतली होती. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार या कार्यक्रमात अफगाणिस्तान, भारत, इराण, चीन, पाकिस्तान, अमेरिका आणि अन्य काही देशांना निमंत्रित केलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *