2000 रुपयांच्या नोटा बंद होणार? बँकांच्या एटीएममध्ये मोठ्या बदलाच्या हालचाली

देशभरातील एटीएममध्ये मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यानंतर आता पुन्हा 2000 रुपयांच्या नोटा बंद होण्याची चर्चा सुरू झाली.

2000 रुपयांच्या नोटा बंद होणार? बँकांच्या एटीएममध्ये मोठ्या बदलाच्या हालचाली
विम्याचा कालावधीः 1 जून ते 31 मे - वार्षिक प्रीमियम ऑटो डेबिट सुविधेद्वारे बँक खात्यातून वजा केले जाते. या चालू असलेल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी 31 मे 2021 पर्यंत त्यांच्या खात्यात पुरेसा शिल्लक ठेवला पाहिजे, जेणेकरून या योजनांचा लाभ कायम राहील.
Follow us
| Updated on: Feb 26, 2020 | 8:41 PM

मुंबई : नोटबंदीनंतर आता पुन्हा 2000 रुपयांच्या नोटा बंद होण्याची चर्चा सुरू झाली. देशभरातील एटीएममध्ये करत असलेल्या बदलांमुळे या चर्चेला अधिक उधाण आलं आहे. बँका एटीएममध्ये 2000 च्या जागी 500 च्या नोटा ठेवण्यासाठी बदल करत आहेत. सर्वात अगोदर ही बातमी बिजनेस स्टँडरने सुत्रांच्या हवाल्याने दिली. यानंतर 2000 च्या नोटा बंद होणार का या चर्चनं जोर पकडला (Indian Banks on 2000 rupees currency). देशभरातील जवळपास 2 लाख 40 हजार एटीएममध्ये असे बदल करावे लागणार आहेत.

एटीएममध्ये नोटा ठेवण्यासाठी 4 कप्पे असतात. त्यात 2000, 500, 200 आणि 100 च्या नोटा ठेवण्यात येतात. आता यात बदल करुन पहिल्या 3 कप्प्यात 500 च्या नोटा ठेवण्यात येतील. उरलेल्या एका कप्प्यात 200 किंवा 100 रुपयांच्या नोटा ठेवण्यात येतील.

चलनात 2000 च्या तुलनेत 500 च्या नोटा वाढणार

विशेष म्हणजे 2019 पासून चलनात 500 च्या नोटा वाढल्या असून 2000 च्या नोटा कमी करण्यात आल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार 2000 च्या नोटा थेट बंद होण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ 2000 च्या ऐवजी 500 च्या नोटा चलनात वाढवण्यात येणार आहेत. एटीएममध्येही हळूहळू यासाठीचे आवश्यक बदल होणार आहेत. 500 रुपयांच्या नोटा वाढवत हळूहळू 2000 च्या नोटा चलनातून बाहेर होतील.

दरम्यान, इंडियन बँकने त्यांच्या ग्राहकांना 1 मार्चपासून एटीएममधून 2000 च्या नोटा निघणार नाहीत, अशा सुचना दिल्या आहेत. 1 मार्चपासून इंडियन बँक आपल्या एटीएममध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांचा भरणा थांबवणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये 2000 हजारांच्या नोटा बंद होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Indian Banks on 2000 rupees currency

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.