अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार, मावशीच्या नवऱ्याला बेड्या

पुणे: घरात एकटीच असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे नराधम आरोपी हा मुलीचा काका म्हणजेच मावशीचा नवरा आहे. 30 वर्षीय नितीन दामोदर असं या आरोपीचं नाव आहे. तो नऱ्हे गावचा रहिवासी आहे. त्याला सिंहगड पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 48 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. नितीनने …

अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार, मावशीच्या नवऱ्याला बेड्या

पुणे: घरात एकटीच असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे नराधम आरोपी हा मुलीचा काका म्हणजेच मावशीचा नवरा आहे. 30 वर्षीय नितीन दामोदर असं या आरोपीचं नाव आहे. तो नऱ्हे गावचा रहिवासी आहे. त्याला सिंहगड पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर 48 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. नितीनने घरात एकटीच असल्याचा फायदा घेत सिंहगड परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. हा प्रकार काल उघडकीस आला. शवविच्छेदन अहवालातून मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले.

राहत्या घरात मुलीवर बलात्कार करून खून झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित कुटुंब सिंहगड भागातील धायरेश्वर वस्तीत राहतं. संबंधित मुलगी ही परिसरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला एक 13 वर्षांचा भाऊ असून, तो आठवीत शिकतो. तिचे आई-वडिल मोल-मजुरीची कामं करतात. नेहमीप्रमाणे आई-वडिल कामासाठी घराबाहेर पडले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. त्यामुळे ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर, त्याने तिला बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली पाहिली. भावाने तिला आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा आवाज देऊनही ती उठत नसल्याने त्याने आई-वडिलांना फोन करुन याबाबत माहिती दिली.

मुलाचा फोन आल्यामुळे आई-वडिलांनी तत्काळ घरी धाव घेतली. यानंतर त्यांनी त्वरीत तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, मुलीचा हात, पाय आणि गळ्यावर जखमा आढळल्या. मृतदेहाचं शवविच्छेदन केलं असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं उघड झालं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *