आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई क्राईम ब्रांचकडून समन्स

भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई गुन्हे शाखेने समन्स पाठवलं आहे.

आयपीएस अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई क्राईम ब्रांचकडून समन्स

मुंबई : भारतीय पोलीस प्रशासनातील अधिकारी प्रवीण पडवळ यांना मुंबई गुन्हे शाखेने समन्स पाठवलं आहे (Mumbai Crime Branch summons IPS Pravin Padval). 2018 मध्ये पायधुनी पोलीस ठाण्यातील खंडणी आणि आर्म अॅक्ट प्रकरणात तारिक प्रवीण आणि सलीम महाराज यांना अटक न करता हे प्रकरण मिटवल्याचा पडवळ यांच्यावर आरोप आहे.

एजाज लकडावलाच्या अटकेनंतर तारिक प्रवीण आणि सलीम महाराज या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यानंतर आता मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावेसुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये आयपीएस प्रवीण पडवळ यांनी कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरुन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. आता या समन्सनंतर प्रवीण पडवळ यांना याचं उत्तर क्राईम ब्राँचला द्यावं लागणार आहे.

गुरुवारी (20 फेब्रुवारी) प्रवीण पडवळ मुंबई क्राईम ब्राँचचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांच्यासमोर हजर राहतील. प्रवीण पडवळ सध्या मुंबई वाहतूक पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. क्राईम ब्रांचच्या म्हणण्यानुसार प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या उत्तरानुसार पोलीस दल आणि अंडरवर्ल्डशी संबंधित धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने क्राईम ब्राँचकडून तपास करण्यात येत आहे.

Mumbai Crime Branch summons IPS Pravin Padval

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *