महिलेचा चालू कारमध्ये बाळाला जन्म, व्हिडीओ व्हायरल

न्यूयॉर्क : अमेरिकेतील निवाडामध्ये एका महिलेने चालू कारमध्ये बाळाला जन्म दिलाय. रुडी नेपियर नावाची महिला तीन मुलं आणि पतीसोबत रुग्णालयात जात होती. रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. यानंतर चालू कारमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला. या घटनेचा व्हिडीओही या दाम्पत्याकडून शेअर करण्यात आलाय. जगभरात या व्हिडीओची चर्चा आहे. प्रसूतीवेळी पती माईक एंटनी हे कार चालवत होते. …

महिलेचा चालू कारमध्ये बाळाला जन्म, व्हिडीओ व्हायरल

न्यूयॉर्क : अमेरिकेतील निवाडामध्ये एका महिलेने चालू कारमध्ये बाळाला जन्म दिलाय. रुडी नेपियर नावाची महिला तीन मुलं आणि पतीसोबत रुग्णालयात जात होती. रस्त्यातच प्रसूती वेदना सुरु झाल्या. यानंतर चालू कारमध्येच महिलेने बाळाला जन्म दिला. या घटनेचा व्हिडीओही या दाम्पत्याकडून शेअर करण्यात आलाय. जगभरात या व्हिडीओची चर्चा आहे. प्रसूतीवेळी पती माईक एंटनी हे कार चालवत होते.

रुडी नेपियर या कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेल्या होत्या. रुग्णालयात जातानाच त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या. मागच्या सीटवर असलेल्या रुडी यांच्या 10 वर्षांच्या मुलाने हा संपूर्ण व्हिडीओ शूट केलाय. काही वेळाने मोबाईलमध्ये हा व्हिडीओ मिळाल्यानंतर वडील माईक यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला. लाखो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

रुडी यांनी स्वतः या घटनेबाबत अत्यंत आनंदाने माहिती दिली. आयुष्यात आजपर्यंत असं होताना कधीही पाहिलं नव्हतं. मी अत्यंत वेगळ्या पद्धतीने मुलाला जन्म दिलाय, असं रुडी यांनी फॉक्स 5 शी बोलताना सांगितलं. या पद्धतीने व्हिडीओ समोर आल्यामुळे या मुलाचीही जगभर चर्चा आहे. या कुटुंबाने फेसबुकच्या माध्यमातून आता निधी जमा करणं सुरु केलंय, जेणेकरुन सर्व कुटुंबासाठी एक गाडी घेता येईल.

माईक यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘BEAUTIFUL nightmare!!’ असं कॅप्शन दिलं. व्हिडीओ शेअर केल्यानंतर माईक यांना हजारो नोटिफिकेशन येत आहेत. पत्नी आणि मुलाच्या देखभालीबाबत त्यांनी रुग्णालयाचेही आभार मानले आहेत. मुलगा आणि आई दोघांचीही प्रकृती अत्यंत चांगली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *