Corona | अधिकारी असो वा कर्मचारी, मास्क नसल्यास मंत्रालयात प्रवेश नाही

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी मंत्रालयात मास्क लावूनच प्रवेश करावा अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही (No Entry in Mantralaya without Corona Mask)

Corona | अधिकारी असो वा कर्मचारी, मास्क नसल्यास मंत्रालयात प्रवेश नाही

मुंबई : मास्क नसल्यास मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही, अशा कडक सूचना ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिल्या आहेत. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 458 वर पोहोचला आहे. (No Entry in Mantralaya without Corona Mask)

पुढील काही महिने मास्कशिवाय मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून या सूचनेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांनी पालन करावे, आणि मंत्रालयात मास्क लावूनच प्रवेश करावा अन्यथा त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात कालच्या दिवसात (5 एप्रिल) 113 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे तर आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात काल 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 8 जण मुंबईतील, 3 जण पुण्याचे तर प्रत्येकी 1 रुग्ण कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद येथील आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुबंई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई319723741026
पुणे (शहर+ग्रामीण)5117938250
पिंपरी चिंचवड मनपा230347
ठाणे (शहर+ग्रामीण)
31963642
नवी मुंबई मनपा20688032
कल्याण डोंबिवली मनपा941918
उल्हासनगर मनपा1803
भिवंडी निजामपूर मनपा98113
मिरा भाईंदर मनपा4751575
पालघर 12013
वसई विरार मनपा59710515
रायगड43155
पनवेल मनपा36012
नाशिक (शहर +ग्रामीण)25222
मालेगाव मनपा72144
अहमदनगर (शहर+ग्रामीण)77365
धुळे1189
जळगाव 418141
नंदूरबार 322
सोलापूर6234142
सातारा31435
कोल्हापूर 26721
सांगली83291
सिंधुदुर्ग1020
रत्नागिरी16724
औरंगाबाद12861448
जालना630
हिंगोली 13210
परभणी241
लातूर 8283
उस्मानाबाद 3730
बीड320
नांदेड 98‬4
अकोला 4201417
अमरावती 18214
यवतमाळ 115220
बुलडाणा 4183
वाशिम 80
नागपूर475847
वर्धा 601
भंडारा1400
गोंदिया 4310
चंद्रपूर2410
गडचिरोली1500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)51012
एकूण52667157861695

(No Entry in Mantralaya without Corona Mask)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *