अवकाळी पावसामुळे डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ, 20 जणांचा मृत्यू

पाऊस लांबल्याने राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया या साथीच्या रोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेंग्यूने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे, तर पंधरा ते वीस जणांचा संशयित मृत्यू झाला आहे.

अवकाळी पावसामुळे डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ, 20 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 03, 2019 | 5:42 PM

पुणे : राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने करोडोंची वित्तहानी केली आहे, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिकं या पावसाने हिरावून घेतली (Nonseasonal Rain). राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे फक्त शेतकऱ्यांचंच नुकसान झालं आहे असं नाही. तर यामुळे रोगराईतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे (Dengue and Chikungunya).

पाऊस लांबल्याने राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया या साथीच्या रोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डेंग्यूने आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे, तर पंधरा ते वीस जणांचा संशयित मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 476 ने वाढ झाली आहे. त्यामुळे हा लांबलेला पाऊस नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं चित्र सध्या राज्यात आहे.

सततच्या पावसामुळे नागरिकांचे आरोग्य ढासळत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने रुग्णालयात रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे.

राज्यात सध्या सहा हजार 390 डेंग्यूचे रुग्ण आहेत. तर आतापर्यंत चौघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. त्याशिवाय, 15-20 रुग्णांचा संशयित मृत्यू झाला आहे. 1 जानेवारी ते 9 सप्टेंबर म्हणजेच 9 महिन्यातील ही संख्या आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत हीच संख्या पाच हजार 914 होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 476 ने वाढ झाली आहे. डेंग्यूशिवाय, चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. चिकनगुनियाचे सप्टेंबर महिन्यापर्यंत 703 रुग्ण आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 102 रुग्ण जास्त आहेत.

सतत पडणाऱ्या पावसाने परिसरात सर्वत्र ओलावा निर्माण झाला आहे. उथळ भागात आणि डबक्यात पाणी साचू लागलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. शुद्ध पाणी आणि साचलेल्या अशुद्ध पाण्यातून डासांची पैदास होत आहे. हे डास चावल्याने डेंग्यू सारखे आजार वाढत आहेत.

डेंग्यूची लक्षणं

डेंग्यू हा शुद्ध पाण्यातील एडीस डास चावल्याने होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला ताप येणे, अंग दुखी इत्यादी लक्षणं जाणवतात. त्याचबरोबर ताप कमी झाल्यानंतर लालसरपणा येणं, हाता पायाला खाज सुटणे, पित्ताशय सूज येऊन धाप लागणे इत्यादी त्रास जाणवू लागतात. तसेच, यामुळे रुग्णाच्या शरीरातील पांढऱ्या पेशी ही कमी होतात. त्यामुळे डेंग्यूची लक्षणं दिसताच तात्काळ वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे.

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. त्यामुळे येत्या काळात अजून साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. राज्याभोवती डेंग्यूचा विळखा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.