जमीन माझी गेली, माझ्या बापाचं नाव समृद्धी महामार्गाला द्या: शेतकरी

शहापूर : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या नामकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आता अशातच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने समृद्धी महामार्गाला आपल्या वडिलांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हरीभाऊ धामणे असं या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. “समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि महात्मा गांधी यांची नावं द्यावी अशी मागणी होत आहे. समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात आहे. या महामार्गात माझी शेतजमीन जात असल्याने, सातबाऱ्यावर माझ्या वडिलांचे नाव असल्याने त्यांचे नाव द्यावे.” अशी मागणी …

, जमीन माझी गेली, माझ्या बापाचं नाव समृद्धी महामार्गाला द्या: शेतकरी

शहापूर : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाच्या नामकरणावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आता अशातच एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने समृद्धी महामार्गाला आपल्या वडिलांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हरीभाऊ धामणे असं या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि महात्मा गांधी यांची नावं द्यावी अशी मागणी होत आहे. समृद्धी महामार्ग भिवंडी तालुक्यातून जात आहे. या महामार्गात माझी शेतजमीन जात असल्याने, सातबाऱ्यावर माझ्या वडिलांचे नाव असल्याने त्यांचे नाव द्यावे.” अशी मागणी हरीभाऊ धामणे यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गासाठी जमीन घेतल्याच्या बदल्यात सरकारने कोणताही मोबदला दिलेला नाही. तसेच सातबाऱ्यावर कोणतीही स्वाक्षरी न करता, माझी जमीन लाटल्याचा आरोप हरीभाऊ धामणे यांनी केला आहे.

त्यामुळे, समृध्दी महामार्गाला माझे वडील वाकळू धामणे यांचे नाव दिल्यास, शेतकरी समाजाचा गौरव ठरेल असेही धामणे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेकडून बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी

शिवसेना नेते आणि राज्य मंत्रीमंडळाचे सदस्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

भाजपकडून वाजपेयींच्या नावाची चर्चा

शिवसेनेने बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी केली तरी भाजपच्या गोट्यात समृद्धी महामार्गाला अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव द्यावं अशी चर्चा आहे.

श्रीहरी अणेंकडून महात्मा गांधींचं नाव देण्याची मागणी

समृद्धी महामार्गाला नाव देण्याच्या वादात माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास विरोध केला होता. श्रीहरी अणे यांनी फेसबूक पोस्ट लिहून हा विरोध केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *