शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची माणुसकी, औरंगाबादेत बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

हॉटेलमध्ये आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कुणीही तयार नव्हतं. मात्र शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. (Shivsena Aurangabad MLC Ambadas Danve performs last rites on unclaimed corpses)

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची माणुसकी, औरंगाबादेत बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या साथीमुळे सध्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला कुणीही धजावत नाही. मात्र औरंगाबादमध्ये शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन माणुसकीचे दर्शन घडवले. (Shivsena Aurangabad MLC Ambadas Danve performs last rites on unclaimed corpses)

औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला होता. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास कुणीही तयार नव्हतं. मात्र त्याचवेळी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

विशेष म्हणजे या मृतदेहाला मुखाग्नीसुद्धा अंबादास दानवे यांनीच दिला. या घटनेमुळे अंबादास दानवे यांच्यातील संवेदनशीलतेचं कौतुक केलं जात आहे. अंबादास दानवे हे सध्या शिवसेनेच्या तिकिटावर विधान परिषदेचे सदस्य आहेत.

हेही वाचा : औरंगाबादेतील ‘कोरोना’ग्रस्त एक हजाराच्या पार

अंबादास दानवे यांच्यामार्फत अंत्योदय योजने अंतर्गत बेवारस व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. या योजने अंतर्गत आतापर्यंत 175 हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अंबादास दानवे यांनी लॉकडाऊनच्या काळातही बेवारस व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले आहेत. एप्रिल महिन्यात एका बेवारस वृद्धेचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह घाटी रुग्णालयात पडून होता. मात्र कुणीही अंत्यसंस्कार करण्यास समोर आलं नव्हतं. त्यावेळीही आमदार अंबादास दानवे यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते. त्याचबरोबर मुखाग्नीही त्यांनी स्वतः दिला होता.

(Shivsena Aurangabad MLC Ambadas Danve performs last rites on unclaimed corpses)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *