Solapur Corona | सोलापुरात 891 कोरोनाबाधित, मृत्यूदर 9.42 टक्क्यांवर

सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 891 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 84 वर पोहोचला आहे.

Solapur Corona | सोलापुरात 891 कोरोनाबाधित, मृत्यूदर 9.42 टक्क्यांवर

सोलापूर : सोलापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Solapur Corona Death Rate) दिवसागणिक वाढत चालली असतानाच मृतांचा आकडासुद्धा वाढत चालला आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 891 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 84 वर पोहोचला आहे. त्यामुळे सोलापुरातील मृत्यूदर हा 9.42 टक्क्यांवर गेला (Solapur Corona Death Rate) आहे.

सोलापुरात आज सकाळच्या अहवालानुसार, 26 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यात एकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातून बऱ्यापैकी रुग्ण बरे होत आहेत. ही समाधानकारक बाब असली तरी दुर्दैवाने मृतांचा आकडा वाढतो आहे. सोलापूरचा मृत्यूदर हा 9.42 टक्क्यांवर गेला (Solapur Corona Death Rate) आहे. हा मृत्यूदर सर्वाधिक मानला जात आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्याचे मोठं आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे.

तर दुसरीकडे, शहरानंतर आता कोरोनाने आता ग्रामीण भागात हातपाय पसरु लागले आहे. जिल्ह्यातील अक्कलकोट बार्शी सांगोला, पंढरपूर तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.

शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्यानेच आलेले मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मनपा अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन 8 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात (Solapur Corona Death Rate) आला आहे.

संबंधित बातम्या :

Unlock 1 | खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

Lockdown 5.0 | शिर्डी रेड झोनमध्ये, साईबाबा मंदिर उघडण्याबाबत अनिश्चितता

रत्नागिरीत 24 तासात 36 जणांना कोरोना, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

कोरोनाग्रस्त पोलिसांसाठी वरळीत उभारणार 100 बेड्सचे कोव्हिड सेंटर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *