30 वर्ष भारतीय सैन्यात काम केलेला जवान 'परदेशी' म्हणून घोषित

गुवाहटी (आसाम) : भारतीय सैन्यात 30 वर्ष सेवा दिलेल्या तसेच निवृत्तीनंतर आसाम पोलीस दलात उप-निरीक्षक पदी काम केलेल्या अधिकाऱ्याला परदेशी म्हणून घोषीत केले आहे. कारगील युद्धात लढलेल्या जवानाला फॉरनर्स ट्रायब्यूनलकडून परदेशी असल्याचे म्हटलं आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस (NRC) मध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांना परदेशी घोषीत करण्यात आलं आहे. मोहम्मद सनाउल्लाह असं या निवृत्त अधिकाऱ्याचे …

, 30 वर्ष भारतीय सैन्यात काम केलेला जवान ‘परदेशी’ म्हणून घोषित

गुवाहटी (आसाम) : भारतीय सैन्यात 30 वर्ष सेवा दिलेल्या तसेच निवृत्तीनंतर आसाम पोलीस दलात उप-निरीक्षक पदी काम केलेल्या अधिकाऱ्याला परदेशी म्हणून घोषीत केले आहे. कारगील युद्धात लढलेल्या जवानाला फॉरनर्स ट्रायब्यूनलकडून परदेशी असल्याचे म्हटलं आहे. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस (NRC) मध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांना परदेशी घोषीत करण्यात आलं आहे. मोहम्मद सनाउल्लाह असं या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे.

NRC मध्ये नाव नसल्याने परदेशी घोषीत केलेल्या सनाउल्लाह यांना आसामच्या कामरुप जिल्ह्यातील कलाहीकाश गावातून अटक केली. त्यांना सध्या डिटेन्शन कॅम्पमध्ये नजरकैदेत ठेवलं आहे.

बोको येथील फॉरनर्स ट्रायब्यूनलने सूचना देत म्हटलं की, “सनाउल्लाह हे  25 मार्च 1971 पूर्वीचा भारतीय नागरिक असल्याचा पूरावा देण्यासाठी अयशस्वी ठरले आहेत. तसेच त्यांचा जन्म भारतात झाला हा पूरावाही सनाउल्लाह देऊ शकले नाहीत”.

सनाउल्लाह यांना परदेशी घोषीत केल्यामुळे अनेकजण याचा विरोध करत आहेत. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सनाउल्लाह यांच्याबद्दल अनेक पोस्ट शेअर करण्यात येत आहे. अनेकांनी त्यांना पाठिंबा देत या घटनेचा निषेधही केला आहे.

सैन्यात ज्युनिअर कमीशन अधिकारी पदावर निवृत्त झालेले मोहम्मद अजमल हक म्हणाले, “आसाममध्ये जन्मानंतर 20 वर्षांनी 1987 मध्ये सनाउल्लाह सैन्यात भरती झाले होते. ते 2017 मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. यानंतर बॉर्डर विंग पोलीस दलात रुजू झाले. त्यांनी एका सुनावणी दरम्यान चुकून 1978 मध्ये सैन्यात भरती झाल्याचा उल्लेख केला होता. या आधारावर न्यायालयाने त्यांना परदेशी घोषीत केले”.

मोहम्मद सनाउल्लाह यांचा जन्म 30 जुलै 1967 रोजी आसामच्या कामरुप जिल्ह्यातील बोको क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या ाकलहिकलाश गावात झाला.

“सनाउल्लाह मूळचे भारतीय नागरिक आहेत आणि उल्लाहने 30 वर्ष भारतीय सैन्यात आपली सेवा दिली आहे. त्यांनी 1987 मध्ये भारतीय सैन्यातून 201 ला निवृत्त झाले. ते ट्रिब्यूनलच्या विरोधात वरच्या कोर्टात जाणार आहेत”, असं सानउल्लाह यांचे वकील म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *