LIVE: मराठा मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: मराठा मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Picture

कुर्ल्यात इमारत कोसळली

#मुंबई – कुर्ला स्टेशन परिसरात संसार हाॅटेल समोरील शकिना मंजिल इमारत कोसळली, अतिधोकादायक यादीतील इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

29/06/2019,2:16PM
Picture

मराठा मोर्चाचे समन्वयक उद्धव ठाकरेंच्या भेटीला

29/06/2019,2:13PM
Picture

ठाण्याच्या कोलबाड परिसरात वीजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

ठाण्याच्या कोलबाड परिसरात झाड पडल्याने विद्यूत पुरवठा खंडित, वीज पूर्वरत करताना विजेचा धक्का लागून 46 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, नागेश निरेड्डी असे मृताचे नाव, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल

29/06/2019,9:17AM
Picture

नागपूर विद्यापीठाकडून 36 महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द

नागपूर विद्यापीठाकडून 36 महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द, नियम आणि अटी न पाळल्यामुळं कारवाई, विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश न घेण्याचेही आवाहन

29/06/2019,9:06AM
Picture

कोकणात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस

कोकणात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस, रत्नागिरी सिंधुदुर्गात रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी, कोकण रेल्वेच्या गाड्याही अर्धा तास उशिराने, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

29/06/2019,9:00AM
Picture

अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

अंबरनाथमध्ये रिक्षा चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, रिक्षा स्टँडवर वृक्षाची फांदी तुटून विजेच्या तारेवर पडल्याने अपघात, विष्णू राजू सोळंकी असे रिक्षा चालकाचे नाव, घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहरात रिक्षा बंद

29/06/2019,8:56AM
Picture

पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत

पावसाने रेल्वेसेवा विस्कळीत, मध्य रेल्वे आणि हर्बल 15 मिनिटांनी उशिरा, प्रवाशांचे हाल

29/06/2019,8:22AM
Picture

धुव्वाधार पावसाने वसई-विरारमध्ये सकल भागातील रस्ते सोसायटी पाण्याखाली

धुव्वाधार पावसाने वसई-विरारमध्ये सकल भागातील रस्ते सोसायटी पाण्याखाली, रात्रीही पावसाची संतातधार सुरूच, विरार पश्चिम विवा कॉलेज रस्ता, नालासोपाऱ्यात सेंत्रालपार्क, आचोले, तुलिंज येथील मुख्य रस्ते पाण्याखाली

29/06/2019,8:15AM
Picture

मुसळधार पावसाने मुंबईमधील चेंबूरमध्ये भिंत कोसळून 4 ते 5 रिक्षांचे नुकसान

रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईमधील चेंबूरमध्ये भिंत कोसळून 4 ते 5 रिक्षांचे नुकसान, पहाटे 3 ची घटना, कोणतीही जीवितहानी नाही, या ठिकाणच्या रहिवाशांच्या 4 पाळीव बकऱ्या मृत

29/06/2019,8:10AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *