AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचा मोठा निर्णय : मोबाईलवरुन ट्रेनचे तिकीट काढताना ही अट हटविली, पाहा काय झाला बदल

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर तिकीटांच्या खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी साल 2014 मध्ये तत्कालिन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते युटीएस ॲपची योजना सुरु करण्यात आली होती. परंतू ऑनलाईन तिकीटाची खरेदी करताना तांत्रिक अटींमुळे ई-तिकीटांची विक्री खिडकीवरील तिकीटांच्या तुलनेने कमी होत आहे.

रेल्वेचा मोठा निर्णय : मोबाईलवरुन ट्रेनचे तिकीट काढताना ही अट हटविली, पाहा काय झाला बदल
UTS Ticket BookingImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 08, 2024 | 5:14 PM
Share

मुंबई : रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी रेल्वेने काही वर्षांपूर्वी युटीएस ॲप आणले होते. परंतू या युटीएस ॲपमध्ये ई-तिकीट काढताना रेल्वे स्थानकापासून ठराविक अंतर उभे राहून ई- तिकीट बुक करावी लागत होती. त्यामुळे प्रवास करताना स्थानकाच्या हद्दीच्या जवळआल्यानंतर तिकीट जनरेट होऊन आपले पैसे बॅंक खात्यातून वळते व्हायचे. परंतू आता रेल्वेने पेपरलेस तिकीट बुक करताना असलेली हद्दीची अट रद्द केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना घर बसल्या लोकलस ट्रेनचे तिकीट बुक करता येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

तत्कालिन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात साल 2014 मध्ये मुंबई उपनगरीय मार्गावर प्रथमच युटीएस मोबाईल ॲपचे लॉंचिंग करण्यात आले होते. तिकीट घरांच्या रांगा कमी करण्यासाठी मोबाईलवरुन ऑनलाईन तिकीट काढण्याचा हा पर्याय सुरुवातीला तितकासा लोकप्रिय झाला नाही. कारण हद्दीची अट तसेच पैसे कापले जाऊनही ई- तिकीट मिळत नसल्याने फारसे प्रवासी मोबाईलने तिकीट काढण्याचा फंद्यात पडायचे नाहीत. आता युटीएस ऑनलाइन मोबाइल ॲपमधून उपनगरीय आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांची तिकीटे ऑनलाईन बुक करता येत आहेत. परंतू आता यूटीएस ऑनलाइन मोबाइल ॲपवरील जियो-फेंसिंगची हद्द हटविली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना स्थानकाच्या जवळ जाऊन तिकीट मोबाईलवर तिकीट बुक करण्याची काही गरज राहणार नाही. तर घरातून तिकीट बुक करुन आरामात प्रवास करता येणार आहे.

आता यूटीएस मोबाईल ॲपवरील जिओ-फेन्सिंगची निर्बंधांची बाह्य मर्यादा हटविण्यात आली आहे. जिओ-फेन्सिंगची बाह्य मर्यादा हटवल्यामुळे प्रवासी आता घरी बसून कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही गंतव्य स्थानकासाठी तिकीट बुक करू शकणार आहेत. तथापि, प्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्यापासून एक तासाच्या आत उपनगरीय लोकलचा प्रवास सुरु करावा तसेच लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या बाबतीत तीन तासांच्या आत प्रवास सुरु करणाऱ्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढणे आवश्यक आहे. यूटीएस ऑन मोबाइल ॲप वापरल्यामुळे सुट्ट्ये पैसे बाळगण्याची गरज नाही, तसेच रांगात उभे राहून वेळ वाया घालविण्याची गरज नाहीत, तसेच आणखीन एक अतिरिक्त फायदा म्हणजे प्रवाशांना आर-वॉलेट रिचार्जवर 3% बोनस मिळणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी म्हटले आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.