येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

 येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

येवल्यात बलात्कारातील संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक : येवल्यात बलात्कारातील (Yewala Corona Latest Update) संशयित आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न नागरिक, पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेला येवला कोरोनामुक्त झाल्याचं चित्र असतानाच येवल्यात आणखी एक कोरोना रुग्ण सापडला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संशयित आरोपीच्या संपर्कात आलेल्या 3 पोलिसांना क्वारंटाईन (Yewala Corona Latest Update) करण्यात आलं आहे.

येवल्यात एका महिलेपासून कोरोनाबधितांची संख्या 32 वर पोहोचल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने येवलेकरांनी कोरोनापासून सुटकेचा निश्वास सोडला होता. आज शनिवारी संध्याकाळी येवला तालुक्यातील कानडी येथील 24 वर्षीय तरुण संशियत आरोपीचा कोरोनाचा तपासणी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बधितांच्या संख्येत नव्याने वाढ झाली आहे. सध्या येवल्यात 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील 32 जणांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे (Yewala Corona Latest Update).

या तरुणाने 20 फेब्रुवारी रोजी एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा येवला शहर पोलीस ठाण्यात 14 मे रोजी दाखल करण्यात आला. त्यानंतर या संशयित आरोपीला ताब्यात घेत कोर्टात हजर केले असता त्याला नाशिक जिल्हा मध्यवर्ती ग्राहक कारागृहात पाठवण्यात आले होते.
कोरोना विषाणूमुळे स्वॅब घेण्यासाठी त्याला येवला येथील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. आज संध्याकाळी आलेल्या कोरोना तपासणी अहवालात या 24 वर्षीय संशियत तरुण आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या संशयित आरोपीच्या संपर्कातील 3 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, त्याच्या संपर्कातील इतरांचा शोध घेतला जात आहे (Yewala Corona Latest Update).
संबंधित बातम्या :
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *