रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस पिण्याचे फायदे!

सफरचंदामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला आजारांपासून वाचवण्याचं काम करतात. अशावेळी सफरचंदाचे सेवन केव्हा करावे हे जाणून घेतले पाहिजे. रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतात?

रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस पिण्याचे फायदे!
Apple juice benefits
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 16, 2023 | 1:39 PM

मुंबई: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सफरचंदामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीराला आजारांपासून वाचवण्याचं काम करतात. अशावेळी सफरचंदाचे सेवन केव्हा करावे हे जाणून घेतले पाहिजे. रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतात?

डोळ्यांसाठी फायदेशीर

सफरचंदाचा रस प्यायल्याने तुमची दृष्टी सुधारते. कारण सफरचंदात व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस प्यायल्याने खूप फायदा होतो.

वजन कमी करते

रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कारण सफरचंदाच्या रसामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते, जे तुमची पचनसंस्था मजबूत ठेवते आणि पोट बराच काळ भरलेले राहते. दुसरीकडे रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

दमा

सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस पिणे खूप फायदेशीर ठरते. यात असणारे पोषक तत्व दम्यावर खूप फायदेशीर असतात. दम्यापासून बचाव करायचा असेल आणि त्यापासून सुटका मिळवायची असेल तर रोज सकाळी सफरचंदाचा रस पिऊ शकता.

कोलेस्ट्रॉल

उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचा रस पिणे खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर सफरचंदाच्या रसात असे अनेक घटक आढळतात जे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास फायदेशीर ठरतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)