हृदयासारखे आता मेंदूतही लागले पेसमेकर – या रुग्णालयात पहिल्यांदा झाली डीप ब्रेन सर्जरी
टीव्ही 9 भारतवर्षशी बोलताना डॉ.शरद पांडेय यांनी सांगितले की आरएमएल रुग्णालयातील ही पहिली सर्जरी आहे. ही सर्जरी नेपाळच्या एका महिला अधिकाऱ्यावर करण्यात आली. आता सर्जरीनंतर महिला रुग्णाची तब्येत स्थिर असल्याचे म्हटले जात आहे.

सर्वसाधारणपणे पार्किंसन आजाराने पीडीत रुग्णांना एका वयोमानानंतर काम करणे कठीण होते. त्यानंतर अत्यंत किचकट अशा ब्रेन सर्जरीच्या एका प्रक्रियेतून रुग्णाला जावे लागते. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात पहिल्यांदा डीप ब्रेन स्टिम्युलेशन सर्जरी झाली आहे. आरएमएल रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागातील विभागध्यक्ष डॉ.शरद पांडेय यांच्या देखरेखीखाली ही सर्जरी करण्यात आली आहे.
दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयातील ही पहिलीच अशा प्रकारची सर्जरी झाली होती. ज्यात नेपाळच्या एका महिला अधिकाऱ्यावर महत्वाची सर्जरी झाली आहे. त्यांनी सांगितले की अशा प्रकारची पहिलीच सर्जरी आहे.
हृदयात पेसमेकर लावणे एका सर्वसामान्य गोष्ट आहे. परंतू आता तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की ब्रेनमध्ये देखील पेसमेकर लावण्यात येत आहेत. नेपाळच्या रहिवासी ५५ वर्षीय सरकारी अधिकाऱ्यावर अशा प्रकारची सर्जरी करण्यात आली आहे. त्यांना पार्किंसनमुळे चालण्या फिरण्यापासून हात देखील थरथरायचे. आणि अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ती रजेवर होती.
ही सर्जरी सोपी नव्हती. या सर्जरीची सुरुवात सकाळी सहा वाजता सुरुवात झाली आणि सायंकाळी ५.३० वाजता ही सर्जरी संपली. यात आरएमएल रुग्णालयाच्या अन्य विभागाच्या डॉक्टरांची देखील मोठे योगदान होते. ज्यात अनेस्थेशिया आणि अनेक विभागा प्रमुखांचा समावेश होता.
डीप ब्रेन स्टिमुलेशन सर्जरी म्हणजे काय ?
डीबीएस (Deep Brain Stimulation – डीप ब्रेन स्टिम्युलेशन) एक आधुनिक न्यूरोसर्जिकल प्रक्रिया आहे. ज्यात मस्तिष्कच्या विशिष्ट क्षेत्रात पातळ इलेक्ट्रोड ( तार ) प्रत्यारोपित केले जाते. मेंदूच्या मुव्हमेंट वा गतिविधीला नियंत्रित करणाऱ्या एका खास भागात खूप बारीक तार टाकले जातात. न्यूरोस्टिम्युलेटर (पेसमेकर सारखे उपकरण) छाती वा पोटाच्या खालीली त्वचेच्या खाली एक बॅटरी संचालित उपकरण लावले जाते. ज्यास पल्स जनरेटर म्हटले जाते. हे उपकरण इलेक्ट्रोडद्वारे नियंत्रित आवेग पाठवतो. ज्यामुळे असामान्य मस्तिष्क गतिविधी आणि लक्षणात सुधारणा होते.
सर्वसाधारणपणे या प्रकारच्या उपचारात जर रुग्णाने कोणत्याही खाजजी रुग्णालयात केले असते तर किमान त्याला ३० लाख रुपयांचा खर्च पडला असता, सरकारी रुग्णालयात हा खर्च कमी आहे.एकदा की डीबीएस सर्जरी झाली की रुग्णांना पार्किंसन्स आजारात औषधाविरोधातील अवलंबित्व खूपच कमी होते. सर्जरीच्या एक ते सहा महिन्याच्या आत रुग्णावर परिणाम जाणवू लागतो.
