बाळ होईल की नाही ? तुमचा आहार ठरवेल… डाएटचा होतो प्रजनन क्षमतेवर परिणाम

infertility Problem : असे अनेक पदार्थ आहेत जे प्रजनन क्षमता वाढवण्याचा दावा करतात. पण ते खरंच खरं असतं का ? जा

बाळ होईल की नाही  ? तुमचा आहार ठरवेल... डाएटचा होतो प्रजनन क्षमतेवर परिणाम
| Updated on: Jun 16, 2023 | 2:37 PM

Infertility : गर्भधारणा (pregnancy) हा महिलांसाठी आव्हानात्मक काळ असतो. या दरम्यान, त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. तथापि, कधीकधी गर्भधारणा अनेक अडचणी आणते. काही स्त्रियांसाठी, ही वेळ खूप वेदनादायक असू शकते. त्याप्रमाणे, ज्या लोकांना वंध्यत्वाची समस्या भेडसावत आहे, ते सर्व तऱ्हेचे प्रयत्न करण्यास तयार असतात.

गर्भधारणेसाठी, ते असे अन्न खाणे सुरू करतात, जे त्यांना खरोखर आवडत नाही. खरं तर, असे अनेक पदार्थ आहेत जे प्रजनन क्षमता वाढवण्याचा दावा करतात. पण ते खरंच खरं असतं का ? तज्ज्ञांच्या मते, असे काही पदार्थ आहेत जे गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी फायदेशीर ठरू शकतात. आहार आणि प्रजननक्षमतेचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

फॉलिक ॲसिड असते गरजेचे

एक लक्षात घेण्यासारखे आहे की अशी अनेक पोषक तत्वे आहेत, जी गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी फायदेशीर आहेत. विशेषतः फॉलिक ॲसिड, जे निरोगी गर्भधारणेसाठी खूप महत्वाचे मानले जाते. गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान फॉलिक ॲसिड घेतल्याने ॲनासेफली (बाळाच्या मेंदूतील जन्मजात दोष) आणि स्पिना बिफिडाचा धोका कमी होतो.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, महिलांनी 400mg फॉलिक ॲसिड घेणे आवश्यक आहे. निरोगी गरोदरपणात फॉलिक ॲसिड फायदेशीर आहे, परंतु त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी अनेक चाचण्या आवश्यक आहेत.

कोणतही मॅजिक फूड नाही

प्रजनन तज्ज्ञांच्या मते, प्रजननक्षमतेच्या सर्व समस्या सोडवणारे असे कोणतेही जादूई अन्न नाही. पण, गर्भधारणेच्या प्रक्रियेत आहार महत्वाची भूमिका बजावतो. पूर्वी स्त्रियांच्या प्रजननक्षमतेबद्दल अधिक बोलले जायचे, परंतु आता पुरुषांच्या प्रजनन क्षमतेकडे लक्ष दिले जात आहे. 2015 च्या संशोधनानुसार, अधिक पोल्ट्री फूड खाल्ल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर सकारात्मक परिणाम झाला, तर अधिक प्रक्रिया केलेले मांस (जसे की बेकन आणि सॉसेज) खाल्ल्याने नकारात्मक परिणाम झाला.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, पुरुषांच्या डाएटचा महिलांच्या आहारावर परिणाम झाला, ज्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे मुलांवर झाला. त्याच वेळी, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मते, हेल्दी फॅट्स आणि प्लांट-बेस्ड डाएट देखील प्रजननासाठी फायदेशीर ठरू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)