Monsoon Tips : आला पावसाळा… हे खाद्यपदार्थ टाळा ! पावसात या पदार्थांकडे बघूही नका

पावसाळ्यात पचनाच्या समस्या आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. असे काही पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाल्ले तर आरोग्यास त्रास होऊ शकतो.

Monsoon Tips : आला पावसाळा... हे खाद्यपदार्थ टाळा ! पावसात या पदार्थांकडे बघूही नका
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 19, 2023 | 5:27 PM

Avoid These Foods In Monsoon : पावसाळ्यात उष्माघात करणाऱ्या उष्णतेपासून सुटका मिळते. पण हा ऋतू जितका आनंददायी वाटतो तितकाच या काळात आजारांचा (disease) धोकाही जास्त असतो. या ऋतूत निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे.

पावसाळ्यात पचनाच्या समस्या आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. असे काही पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाल्ले तर आरोग्यास त्रास होऊ शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर खाली नमूद केलेले काही पदार्थ पावसाळ्यात अजिबात खाऊ नयेत.

पालेभाज्या

पालक, मेथी, अळू, पालक, आणि कोबी यासारख्या पालेभाज्या अतिशय आरोग्यदायी मानल्या जातात. मात्र, पावसाळ्यात आर्द्रता आणि पाणी साचल्याने या भाज्या दूषित होतात. बॅक्टेरिया आणि कीटक पालेभाज्यांमध्ये त्वरीत प्रवेश करतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही पालेभाज्या खाणार असाल तर त्या नीट धुवून शिजवा

स्ट्रीट फूड

स्ट्रीट फूड खाण्यास चवदार असू शकते. पण पावसाळ्यात ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णपणे स्वच्छ नसतात, त्यामुळे ते लवकर दूषित होऊ शकतात. चाट, पकोडे, समोसे असे सर्व रस्त्यावरचे पदार्थ आपल्या पचनासाठी चांगले नसतात. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यास सूज येऊ शकते.

सीफूड खाऊ नका

सीफूडप्रेमींनी पावसाळ्यात काळजी घेणे आवश्यक आहे. या हंगामात मासे आणि शंख चटकन दूषित होऊ शकतात. याशिवाय जलप्रदूषणामुळे सीफूडच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो, त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.

दुग्धजन्य पदार्थ

पावसाळ्यात आर्द्रतेमुळे दुग्धजन्य पदार्थ खाण्यासही सुरक्षित नाहीत. कच्चे दूध, दही किंवा पनीर यांसारख्या नॉन-पाश्चराइज्ड डेअरी उत्पादनांमध्ये अनेक हानिकारक जीवाणू असतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)