नॉनव्हेज खाल्ल्याने वाढतो हार्ट ॲटॅकचा धोका ? डॉक्टरांचे म्हणणे काय ?
हल्ली कमी वयात हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बदलेली जीवनशैली आणि नॉनव्हेजचे वाढते प्रमाण यासाठी जबाबदार म्हटले जाते. परंतू तज्ज्ञांचे म्हणणे मात्र वेगळे आहे.

गेल्या काही वर्षा हार्ट ॲटॅकच्या संख्या वाढत आहे. याचे एक कारण डॉक्टर खाण्याच्या सवयीला देत आहेत. हृदयविकार तज्ज्ञांकडे येणारे रुग्ण त्यांना एक प्रश्न विचारतात की नॉनव्हेज खाल्ल्याने हृदयाचा आजार वाढतो का ? या संदर्भात डॉक्टरांनी हार्ट अटॅक आणि खाण्याच्या सवयी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच हृदयाच्या आजारापासून वाचण्या संदर्भात माहिती देखील दिली आहे.
नॉनव्हेज खाल्ल्याने हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो की नाही हे यावर अवलंबून आहे की हे नॉन व्हेज कोणत्या प्रकारचे आहे, त्याला कशाप्रकारे शिजवलेले आहे.किती प्रमाणात आणि किती वेळा खाल्ले जात आहे. खासकरुन सॉसेज, बेकन, सलामी सारखे प्रोसेस्ड मीट आणि जास्त मीठ वा सॅच्युरेटेड फॅट असणाऱ्या मीट संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे.
या कारणांनी वाढतो हार्ट अटॅकचा धोका
आमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि सांगतात की हृदयाच्या आजाराने नॉनव्हेज खाणे बंद करु का ? असे सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉ.अदिती दत्तगुप्ता यांनी सांगितले. या संदर्भात माहिती देताने ते म्हणतात की हार्ट ॲटॅकचा धोका केवळ कोणत्या खास प्रकारच्या डाएटने निश्चित होत नाही. हाय ब्लडप्रेशर, वाढलेले कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, लठ्ठपणा आणि कुटुंबियात हार्ट डिसीजचा इतिहास मिळून याचा रिस्क वाढतो. जर एखाद्या व्यक्तीने सतत जास्त फॅटवाले मीट, डीप फ्राय नॉनव्हेज आणि जास्त मीठाचे सेवन केले तर यामुळे वजन, ब्लड प्रेशर आणि खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता वाढू शकते. ज्यामुळे दीर्घकाळ हार्टची नसांवर याचा परिणाम होऊ शकतो.
रेड आणि प्रोसेस्ड मीट धोकादायक
नॉनव्हेज खाण्याचा थेट हार्टच्या डिसीजशी थेट संबंध नाही. परंतू जास्त प्रमाणात विशेष प्रकारचे नॉनव्हेज उदा. रेड मीड आणि प्रोसेस्ड मीट जास्त सेवन केल्याने हार्ट ॲटॅकचा धोका जास्त असतो. रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट अधिक असते.हे शरीरात LDL ( बॅड कोलेस्ट्रॉल ) ला वाढवू शकते. ज्यामुळे ब्लॉकेज होऊ शकतात.
नॉनव्हेज संपूर्णपणे सोडण्याची गरज नाही
नॉनव्हेज संपूर्णपणे सोडून देणे प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे नाही. कमी फॅटचे नॉनव्हेज उदा. मासे आणि कमी तेल – मीठात तयार केलेले अन्न चांगले असते. तसेच डाएटमध्ये भाज्या,भरड धान्य फळ, डाळी आणि पर्याप्त फायबर सामील करणे गरजेचे असते.
