Health Tips : चाळिशीनंतर महिलांनी आरोग्याकडे द्या लक्ष, हे 5 व्यायाम प्रकार नियमित करा

Health Tips : चाळिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. चाळीशीनंतर चयापचय क्रिया मंदावते आणि स्नायू व हाडे कमकुवत होतात. यासाठी हे पाच व्यायाम प्रकार नियमित करा...

Health Tips : चाळिशीनंतर महिलांनी आरोग्याकडे द्या लक्ष, हे 5 व्यायाम प्रकार नियमित करा
| Updated on: Sep 22, 2026 | 8:54 AM

Health Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गोष्टी अशा घडत असतात ज्यामुळे आपलं आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. घराची जबाबदारी, कामाचा ताण या सर्व गोष्टींमुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अशात चाळिशीनंतर महिलांच्या शारीरात अनेक बदल होत असतात. म्हणून फिटनेससाठी महिलांनी काही व्यायाम प्रकार करणं गरजेचं आहे. चाळीशीनंतर फिटनेस फार महत्त्वाच आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी सर्वोत्तम व्यायाम माहिती असणं गरजेचं आहे. जसजसं वय वाढतं, तसतसं महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. चाळीशीनंतर चयापचय क्रिया मंदावते आणि स्नायू व हाडे कमकुवत होतात. या बदलांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, नियमित व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे आवश्यक आहे.

दररोज किमान 30 ते 45 मिनिटं वेगाने चालल्याने हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांना दूर ठेवण्यासाठी चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे सांध्यांवर जास्त ताण येत नसल्याने, हे कोणीही सहज करू शकतं.

वाढत्या वयानुसार स्नायूंची ताकद कमी होणे स्वाभाविक आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे हे टाळता येते. वजन उचलण्याचं व्यायाम आणि रेझिस्टन्स ट्रेनिंग चांगलं असतं. जिममध्ये ट्रेनरच्या सूचनांनुसार व्यायाम करणं उचित ठरतं. स्वतःहून व्यायाम करताना, तुम्ही तो योग्य पद्धतीने करत आहात याची खात्री करणं आवश्यक आहे.

तुमचे पाय मजबूत करण्यासाठी स्क्वॅट्स हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमच्या मांड्या, नितंब आणि गुडघ्यांचे आरोग्य सुधारतं आणि तुमचा तोल सांभाळण्यास मदत होते. वाढत्या वयानुसार पडण्याचा धोका कमी करण्यासही हे व्यायाम मदत करू शकतात. तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी पायांचे स्नायू मजबूत करणं महत्त्वाचं आहे.

सायकलिंग आणि पोहण्यासारखे कमी ताणाचे कार्डिओ व्यायाम संधिवात आणि इतर आजार असलेल्या लोकांसाठी उत्तम आहेत. ते सांध्यांवर जास्त ताण न टाकता हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यास मदत करतात. ते रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगलं आहेत. तसेच ते मानसिक ताण कमी करण्यासही मदत करतात.

जसजसं आपलं वय वाढतं, तसतशी आपल्या शरीराची लवचिकता कमी होऊ लागते. त्यामुळे, दररोज स्नायू आणि सांध्यांवर ताण देणारे स्ट्रेचिंग व्यायाम करणं फायदेशीर ठरते. ही एक उत्तम व्यायाम पद्धत आहे, जी अंगदुखी कमी करण्यास आणि दुखापती टाळण्यास मदत करते. व्यायाम सुरू करण्यापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नका. पण कोणतेही व्यायाम प्रकार करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us