कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास डार्क चॉकलेट खा; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा सल्ला

कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. (Health Minister Harsh Vardhan recommends dark chocolate to beat COVID stress)

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास डार्क चॉकलेट खा; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचा सल्ला
harsh vardhan
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 10:24 AM

नवी दिल्ली: कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन यांनी जारी केली आहे. (Health Minister Harsh Vardhan recommends dark chocolate to beat COVID stress)

डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे कोविडचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

स्ट्रेस कमी होतो याला आधार काय?

डार्क चॉकलेटमध्ये 70 टक्के कोको कंटेन्ट असतं. त्यामुळे कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते, म्हणून डार्क चॉकलेट खा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हर्षवर्धन यांनी हा सल्ला दिल्यानंतर पुण्यात आणि भोपाळमध्ये संशोधन करणारे अनंत भान डार्क चॉकलेट खाल्ल्याने कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते याला आधार काय? असा सवाल केला आहे. डार्क चॉकलेट घेणं किती लोकांना परवडणार आहे?, असा सवालही भान यांनी केला आहे.

हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेटसह अन्य पदार्थांची यादीही दिली असून त्यातून इम्युनिटी पॉवर वाढत असून स्ट्रेसही कमी होत असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी शरीरात अधिकाधिक व्हिटॅमिन जाण्यासाठी भाजीपाला आणि फळांचं सेवन वाढवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्याचा मेन्यू

मांसपेशींमध्ये इम्युनिटी आणि एनर्जी लेव्हल वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचं सेवन करा. साबूत, ओट्स आणि अमरनाथचं सेवन करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. प्रोटीनसाठी चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया आणि नट्सचं सेवन करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

हळदीचं दूध घ्या

त्याशिवाय नियमित योग आणि प्राणायाम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तसेच तणावापासून दूर राहण्यासाठी 70 टक्के कोको असलेलं डार्क चॉकलेटचंही सेवन करा. तसेच इम्युनिटी वाढवण्यासाठी हळदीयुक्त दूध प्या, असा सल्लाही देण्यात आला आहे. (Health Minister Harsh Vardhan recommends dark chocolate to beat COVID stress)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: काँग्रेस नेते राजीव सातव यांची कोरोनावर मात

LIVE | औरंगाबादेत मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Maharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत लॉकडाऊनमध्ये अवैधपणे दुकाने उघडल्याने 28 जाणांवर गुन्हे

(Health Minister Harsh Vardhan recommends dark chocolate to beat COVID stress)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.