AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips: फक्त काही सवयी बदला, वजन होईल कमी, रोज जीमला जाण्याची गरज नाही

Weight Loss Tips: आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आरोग्य... पण आरोग्याकडेच सर्वांचं दुर्लक्ष होत असतं... यामध्ये सर्वांत मोठी समस्या असते वाढतं वजन... तर राही सोप्या टीप्स वापरुन तुम्ही स्वतःचं वजन कमी करु शकता...

Weight Loss Tips: फक्त काही सवयी बदला, वजन होईल कमी, रोज जीमला जाण्याची गरज नाही
Weight Loss
| Updated on: Oct 12, 2026 | 3:20 PM
Share

वजन कमी करण्यासाठी अनेक जण जेवण बंद करतात. जास्त खाणं टाळतात, रोज जीममध्ये जातात. पण तरी देखील वजन कमी होत नाही… तर डाएट आणि व्यायामासह विविध पद्धती वापरून पाहतात. पण, त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. त्यांनी आपल्या दैनंदिन सवयींचा योग्य प्रकारे आढावा घेणं खूप महत्त्वाचं आहे. विशेषतः, संध्याकाळी जास्त खाणं, रात्री पुरेशी झोप न घेणं आणि तणावाखाली खाणं या गोष्टी वजन नियंत्रणात अडथळा ठरु शकतात. तर, संध्याकाळी 5 नंतर खाल्ल्याने वजन वाढतं, वजन कमी करण्यासाठी कोणत्या मुख्य टिप्स पाळाव्यात हे जाणून घ्या .

दिवसा कमी खा आणि रात्री जास्त खाऊ नका. वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण टाळल्यास काही लोकांना संध्याकाळी खूप भूक लागू शकते. यामुळे रात्री अति खाण्याची सवय लागू शकते. म्हणून, दिवसभर आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे संतुलित प्रमाणात मिळवणे अधिक चांगलं आहे.

बाहेरचं खाणं टाळा. संध्याकाळच्या चहाबरोबर चिप्स, बिस्किटे आणि तळलेले पदार्थ, पाणीपुरी खाणं ही एक सामान्य गोष्ट आहे. ते थेट पॅकेटमधून खाल्ल्याने प्रमाणाकडे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्यामुळे, त्याऐवजी तुम्ही फळे, साखर नसलेले दही किंवा माफक प्रमाणात सुकामेवा खाऊ शकता.

पुरेशी झोप न मिळाल्यास भूक आणि खाण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. प्रौढांनी साधारणपणे रात्री सात ते नऊ तास झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दररोज एकाच वेळी झोपल्यानेही मदत होऊ शकते. एवढंच नाही तर, वजन कमी करण्यासाठी रात्री भात खाऊ नये असा कोणताही नियम नाही. त्याऐवजी, भात किंवा चपातीसोबत आवश्यक प्रमाणात भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थ खाणे अधिक चांगलं आहे.

वजन कमी करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना म्हणजे, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांना प्राधान्य द्या. झटपट वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं किंवा कठोर आहाराचं पालन करणं टाळा. तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असल्यास तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....