AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खजूर खाल्ल्यानंतर करताय अशी चूक, असं केल्यास आरोग्यास मिळतील तिप्पट फायदे

खजूर आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. पण अनेक जणून खजूर खाल्ल्यानंतर मोठी चूक करतात, ज्यामुळे मोठं नुकसान होतं... पण असं काही केल्यास तुमच्या आरोग्यास तिप्पट फायदे मिळतील.

खजूर खाल्ल्यानंतर करताय अशी चूक, असं केल्यास आरोग्यास मिळतील तिप्पट फायदे
| Updated on: May 24, 2026 | 8:12 PM
Share

खजूर खाल्यानंतर अनेक जण बिया फेकून देतात. पण खजूरच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. खजूर हा निरोगी शरीरासाठी एक उत्तम घटक आहे. आपल्यापैकी बरेच जण नियमितपणे या पोषक तत्वांनी समृद्ध सुपरफूडचा आपल्या आहारात समावेश करतात. मात्र, खजूर खाल्ल्यानंतर आपण सहसा त्याच्या बिया कचऱ्यात फेकून देतो. पण अनेकांमा माहिती नसेल की, निष्काळजीपणे फेकून दिल्या जाणाऱ्या या बिया प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरू शकतात?

आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये खजुराच्या बिया वापरून स्वादिष्ट कॉफी बनवण्याची एक अनोखी पद्धत दाखवण्यात आली आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे, या कॉफीची चव आणि सुगंध नेहमीच्या कॉफीसारखाच असतो, ज्यात भाजलेल्या कॉफीचा छान स्वाद असतो, पण त्यात कॅफीनचे प्रमाण जवळजवळ शून्य असते.

ज्यांना आपल्या रोजच्या चहा किंवा कॉफी पिण्याच्या सवयीत बदल करून काहीतरी आरोग्यदायी करून पहायचे आहे, त्यांच्यासाठी ही घरगुती ‘खजुराच्या बियांची कॉफी’ एक उत्तम पर्याय ठरू शकते. केवळ खजूरच नव्हे, तर त्याच्या बियादेखील पोषक तत्वांनी समृद्ध असतात. संशोधकांच्या मते, खजुराच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

याशिवाय, त्यात डायटरी फायबर, आरोग्यदायी चरबी, प्रथिने आणि विविध आवश्यक खनिजे असतात. परिणामी, या बियांपासून बनवलेले पेय शरीराचे सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

हे आरोग्यदायी पेय घरी अगदी सहज बनवता येते. त्याची सोपी कृती देखील फार सोपी आहे. 10 – 12 खजुराच्या बिया घ्या, 1 कप पाणी किंवा दूध, चवीनुसार मध किंवा गूळ, थोडी दालचिनी पूड घाला. सर्वप्रथम, खजुराच्या बिया पाण्याने चांगल्या प्रकारे धुवा, जेणेकरून त्यावरील गोडवा किंवा घाण पूर्णपणे निघून जाईल.

धुतल्यानंतर, बिया उन्हात किंवा पंख्याखाली ठेवून पूर्णपणे सुकवाव्यात. सुकवलेल्या बिया एका पातेल्यात मंद आचेवर 12 ते 20 मिनिटे कोरड्या भाजून घ्या. जेव्हा बियांचा रंग गडद तपकिरी होईल आणि कॉफीसारखा सुखद सुगंध येऊ लागेल, तेव्हा गॅस बंद करा. बिया थंड झाल्यावर, मिक्सर किंवा ग्राइंडर वापरून त्यांची बारीक पूड करा. बस्स, तुमची घरगुती ‘खजूर बियांची कॉफी पावडर’ तयार आहे. तुम्ही ती हवाबंद डब्यात दीर्घकाळ साठवून ठेवू शकता. आता एका भांड्यात पाणी किंवा दूध गरम करा. त्यात 1 ते 2 चमचे खजूर बियांची कॉफी पावडर घाला. मध्यम आचेवर सुमारे पाच मिनिटे उकळवा, जेणेकरून स्वाद चांगला येईल.

Follow Us
मंत्र्यांचे खिसे झटकले तरी....; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी जमा होतील; दुष्काळावरून संजय राऊतांचा घणाघात
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु....
Dasara Melava : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु; उद्धव ठाकरे नेमका कोणता नवा संदेश देणार?
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर