AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदनेत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी खाणे कितपत सुरक्षित ? CDSCO ने दिला इशारा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर आणि एंटीबायोटिक्स दीर्घकाळ घेतल्याने किडनी खराब होण्याची शक्यता असल्याचा इशारा CDSCO ने दिला आहे.

वेदनेत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी खाणे कितपत सुरक्षित ? CDSCO ने दिला इशारा
Pain killer tablet side effects
| Updated on: Sep 28, 2026 | 4:36 PM
Share

पेनकिलर आणि एंटीबायोटिक्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ घेतल्याने तुमची किडनी डॅमेज होऊ शकते. या संदर्भात केंद्री औषध मानक नियंत्रण संघटनेने ( CDSCO) सावधानतेचा इशारा देणार आहे. CDSCO ने म्हटले आहे की या औषधांचा वापर योग्य डोस आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे योग्य आहे. CDSCO च्या परिपत्रकानुसार पेनकिलर आणि एंटीबायोटिक्स ही प्रिस्क्रिप्शननुसारच वापर करणारी औषधे आहेत. यांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाणे धोकादायक ठरु शकते.

आजकाल लोक जरा काही दुखू लागले किंवा इन्फेक्शन झाले तर एंटीबायोटिक घेतात. डोकेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी वा अंगदुखी यात सामान्य तक्रारीत औषधे घेणे सोपे वाटते. परंतू वारंवार आणि दीर्घकाळ अशा प्रकारची औषधे घेतली तर किडनी खराब होण्याची रिस्क असते. या प्रकारच्या केस रुग्णालयात येत असतात. यात लोकांची किडनी केवळ यामुळे फेल होते की त्यांनी पेनकिलर औषधे दीर्घकाळ घेतली.

वेदनेत गोळी खाणे कितपत सुरक्षित?

पेनकिलरचा वापर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो.परंतू या औषधांना वारंवार किंवा दीर्घकाळ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्याने काही लोकांमध्ये किडनी संबंधी समस्येची जोखीम वाढू शकते. खासकरुन त्या लोकांना ज्यांना आधीच किडनीचा आजार आहे त्यांना अधिक धोका असतो.

अशा प्रकारच्या केस खूपवेळा येत असतात. कमी वयातही किडनी खराब झाल्याच्या केस येतात. याचे कारण दीर्घकाळ पेनकिलर सेवन करणे हे आहे. डोकेदुखी पासून सांधे दुखी यात या गोळ्यांचा वापर वाढला आहे. परंतू हे क्रोनिक किडनी डिसिजचे कारण बनत आहे. अनेक प्रकरणात रुग्णांना डायलिसिस देखील करावे लागत असल्याचे नेफ्रोलॉजी विभागाचे डॉ.वैभव तिवारी यांनी सांगितले. वेदनेत तुम्ही महिन्यात एक वा दो दिवस तुम्ही गोळी खाऊ शकता. दर वेदना सतत होत असेल तर या प्रकरणात डॉक्टारांचा सल्ला घेऊनच गोळ्या सेवन कराव्यात असेही डॉ. तिवारी यांनी सांगितले.

एंटीबायोटिक सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक

केवळ पेनकिलरच नाही तर एंटी बायोटिस्क देखील डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेणे नुकसानकारक होऊ शकते. प्रत्येक ताप, सर्दी वा व्हायरल इन्फेक्शनमध्ये एंटीबायोटिकची गरज नसते. CDSCO ने लोकांना एंटीबायोटिक्ससोबत सेल्फ -मेडिकेशनपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्या इन्फेक्शनमध्ये एंटीबायोटिक्सची गरज आहे किंवा नाही, कोण-कोणती औषधे घ्यायची आणि किती दिवस घ्यायची हे सर्व डॉक्टर आजार आणि रुग्णाची स्थिती पाहून निर्णय घेत असतात.

–

Follow Us
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?