AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाचा का आहेत मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर!

मशरूम भारतात सहज उपलब्ध आहेत. तसे तर मशरूमच्या अनेक प्रजाती आहेत. अशावेळी मशरूमची कोणती प्रजाती आरोग्यासाठी चांगली आहे, हे जाणून घ्यायला हवं. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना मशरूम खूप आवडतात. पण तुम्हाला माहित आहे का की मशरूम खाल्ल्याने मृत्यूही होऊ शकतो.

वाचा का आहेत मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर!
eating mushroom
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 22, 2023 | 6:08 PM
Share

मुंबई: आहारात मशरूमचा समावेश केल्याने मेंदू वेगवान होतो, असे म्हटले जाते. मशरूमचे बरेच प्रकार आहेत. अनेक ठिकाणी मशरूमला ‘आळंबी’ असेही म्हणतात. मशरूम बनविणे देखील सोपे आहे. त्याचप्रमाणे ते पाकिटांच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. काही लोक मांसाहारी पदार्थांऐवजी मशरूम खाणे पसंत करतात. त्याची भाजी एकदम चविष्ट दिसते. त्याचबरोबर उकडलेले मशरूम देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

आजकाल लोक मशरूमपासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतात. मशरूममध्ये अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, कॉपर, लोह आणि सेलेनियम पुरेशा प्रमाणात आढळतात. याशिवाय मशरूममध्ये कोलीन नावाचे विशेष पोषक तत्व असते. हे आपले स्नायू मजबूत बनवते. तसेच मशरूममुळे स्मरणशक्ती वाढते. आज आपण हे खाण्याचे इतर फायदे जाणून घेणार आहोत.

बाजारात अनेक प्रकारचे मशरूम आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. चमकदार रंगाचे मशरूम तुम्ही अनेकदा बाजारात पाहिले असतील. मशरूमची ही प्रजाती आरोग्यासाठी सर्वात विषारी मानली जाते. त्यामुळे मशरूम खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या.

1. मशरूम खाल्ल्याने अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. मशरूममध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण चांगले असल्याने ते तुम्हाला कॅन्सरपासून वाचवते, असे आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे. मशरूम हाडे मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. कर्करोगाने ग्रस्त व्यक्तीने मशरूमचे सेवन अवश्य करावे.

2. मशरूमचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. हे आपण जवळजवळ प्रत्येक ऋतूत खाऊ शकता. पण त्याच्या प्रजातींची काळजी घ्या. मशरूममध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यास उपयुक्त ठरतात.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?