AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देश कोरोनामुक्त केला, आता ओमिक्रॉनला घाबरून स्वत:चाच विवाह सोहळा रद्द; न्यूझीलंडच्या पंतप्रधान Jacinda Ardern यांचा मोठा निर्णय

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी देशभरात काटेकोर अंमलबजावणी करून कोरोनावर नियंत्रण मिळवलं.

देश कोरोनामुक्त केला, आता ओमिक्रॉनला घाबरून स्वत:चाच विवाह सोहळा रद्द; न्यूझीलंडच्या पंतप्रधान Jacinda Ardern यांचा मोठा निर्णय
New Zealand PM Jacinda Ardern
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 2:02 PM
Share

वेलिंग्टन: कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी देशभरात काटेकोर अंमलबजावणी करून कोरोनावर नियंत्रण मिळवलं. संपूर्ण न्यूझीलंड कोरोनामुक्त केला. पण आता पुन्हा एकदा न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने डोकं वर काढले आहे. त्यामुळे देशात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर जेसिंडा अर्डर्न यांनी आपला विवाह सोहळाही रद्द केला आहे. तशी घोषणाच त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ऑकलंड येथे एका विवाह सोहळ्यात एक कुटुंब सहभागी झालं होतं. या कुटुंबातील नऊ जणांना कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली. त्यानंतर देशात कोरोना निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आज ही घोषणा केली. न्यूझीलंडमधील कोरोना रोखण्यासाठी रंगावर आधारीत धोरण ठरवण्यात आलं आहे. त्यानुसार सोमवारी रेड सेटिंग अंमलात येणार असून प्रत्येकाला मास्क वापरणे आणि समागमात लोकांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निर्बंध असतील पण लॉकडाऊन नाही

रेड सेटिंग म्हणजे लॉकडाऊन नाही. उद्योग व्यवसाय सुरू राहतील. नातेवाईकांना, मित्रांना भेटण्याची परवानगी राहील. देशातील लोकांना फिरण्यास मुभा असेल. कोरोनाप्रमाणेच सुरुवातीच्या टप्प्यातच ओमिक्रॉनवर नियंत्रण आणायचं आहे. त्यासाठी आपण टेस्टिंगचा वेग वाढवणार आहोत. संपर्कात आलेल्यांचा शोध घेणार आहोत, असं जेसिंडा यांनी सांगितलं.

तर ओमिक्रॉन रोखणं कठिण

ज्या देशांमध्ये कोरोना संक्रमणाने ओमिक्रॉनचं स्वरूप धारण केलं नाही, अशा देशांपैकी न्यूझीलंड एक देश आहे. मात्र, जर हा संसर्ग फैलावला तर त्याला रोखणं कठिण जाईल, असं त्यांनी मान्य केलं. ओमिक्रॉन रोखण्यासाठीच न्यूझीलंड सतर्क झालं आहे. मी माझा विवाह सोहळा देखील रद्द करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

देशात कोरोना ओमिक्रॉनचा कहर सुरु, मास्क वापरण्याची सक्ती मागं; ब्रिटनच्या पंतप्रधानांची घोषणा, बोरिस जॉनसन काय म्हणाले?

New Guidelines for International Travelers in India | या 19 देशातून येणाऱ्यांसाठी असणार नवी नियमावली

BombBlast: एकामागून एक पाच स्फोटांनी लाहोर हादरलं, जमिनीत दीड फुटांचा खड्डा, 5 मृत्यू, 20 जण जखमी,

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.